शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

१८ कागदपत्रांची पूर्तता करताना उमेदवारांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST

नागभीड : तालुक्यात ४३ ग्रा.पं.ची निवडणूक होणारआहे. ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने इच्छूकांची धावपळ सुरू आहे. यावेळी ...

नागभीड : तालुक्यात ४३ ग्रा.पं.ची निवडणूक होणारआहे. ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने इच्छूकांची धावपळ सुरू आहे. यावेळी उमेदवारांना प्रथमच १८ प्रकारचे कागदपत्रे गोळा करता प्रत्येकाची दमछाक होत आहे. मंगळवारपर्यंत ७२७ उमेदवारांनी आँनलाईन अर्ज दाखल केले.

१५ जानेवारी २०२१ रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची नामांकन दाखल करण्याचा मंगळवारी शेेवटचा दिवस आहे. निवडणुकीसाठी नामांकन अर्जसोबत १८ प्रकारची कागदपत्रे जोडावी लागत आहेत. यात आँनलाईन भरलेले नामांकनाची स्वाक्षरी प्रत, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे स्वयघोषणापत्र, जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचे टोकन, मालमत्ता व दायित्वाचे स्वयंघोषणापत्र, चिन्हांच्या मागणीचे पत्र, मतदार यादीत नाव असल्याची प्रमाणित प्रत, रहिवासी दाखला, शौचालय असल्याचा दाखला, अपत्याचा दाखला, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, कंत्राटदार नसल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, निवडणूक कार्ड, वयाचे प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, गृहकर व पाणीकर पावती तसेच नवीन खाते उघडलेले बँकेचे पासबुक आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

७२७ उमेदवारांचे अर्ज दाखल

नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी ३६३ सदस्यांची निवडणूक होणार आहे. यासाठी मंगळवारपर्यंत ७२७ उमेदवारांनी आँनलाईन अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार शेवटचा दिवस आहे. उमेदवार आँनलाईन अर्ज आपल्या सोयीनुसार दाखल करून आँफलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात येत आहेत.

राजकीय पक्षांचे लक्ष

ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढविल्या जात नाही. कोण कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता व समर्थक आहे हे गावक-यांना ठाऊक असते. मात्र, गावातील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नागभीड येथील नेते तहसील कार्यालय परिसरात विविध सूचना करीत असल्याचे दिसून येत आहे.