शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक होण्यासाठी उमेदवारांची पायपीट

By admin | Updated: October 26, 2015 01:13 IST

जिंदाबाद... जिंदाबाद... विजयी करा... अशा घोषणा देत कार्यकर्ते सध्या जीव ओतून प्रचाराचे काम करीत आहेत.

मतदारांशी वैयक्तिक संपर्क : प्रचार फेऱ्यांना आला जोरखडसंगी: जिंदाबाद... जिंदाबाद... विजयी करा... अशा घोषणा देत कार्यकर्ते सध्या जीव ओतून प्रचाराचे काम करीत आहेत. नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षाच्या उमेदवाराना जिवाचे रान करावे लागत आहे. मतदान होईपर्यंत प्रत्येक उमेदवाराला दररोज सकाळ सायंकाळ प्रभागाच्या कमीत कमी चार- पाच फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे उमेदवारांवर आपला प्रचार व भूमिका मांडण्यासाठी पर्यायाने नगरसेवक होण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.नव्यानेच निर्माण झालेली चिमूर नगरपरिषदेची प्रथमत: सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळावा व आपल्या नावाची इतिहासात नोंद व्हावी, यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. मतदारांशी संपर्क साधण्यात जो कुचराई दाखवील, त्याला विजयापासून दूर राहावे लागण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी मैदानातील प्रत्येक उमेदवाराला दररोज दिवसभर कमीत कमी पाच-सहा किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे.ऐन सणासुदीच्या दिवसांत नगरपरिषदेना रणसंग्राम भरात आला असून आपले नाव लोकापर्यंत पोहोचावे, आपल्या पक्षाची भूमिका त्यांना कळावी यासाठी मतदारांपर्यंत वैयक्तिकरीत्या संपर्क साधण्यास सर्वांचे प्राधान्य आहे. यासाठी ‘डोअर टू डोअर’ तसेच वसाहतीमधील प्रत्येक चौकापर्यंत पोहोचण्याचे नियोजन उमेदवारांकडून केले जात आहे. पण हे करताना उमेदवारांना घाम गाळावा लागत आहे. कारण आधुनिक युगात ऊठसूठ गाड्या घेऊन जाण्याच्या सवयीमुळे अनेकजण पायदळ चालणेच विसरले आहेत. त्यामुळे काही अंतर जरी चालले तरी अनेकांना दम लागत आहे.विजयासाठी एक-एक मतांचे मूल्य असल्याने उमेदवारांना कार्यकर्त्यांना दूरवरची प्रचाराची फेरी काढण म्हणजे एक दिव्यच ठरत आहे. सत्तेसाठी प्रचार करावाच लागणार असल्याने अनेक पुरुष-महिला उमेदवारांनी नास्ता, शीतपेय यांची सोय केली आहे. त्यामुळे प्रचारातील कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होत आहे. काही जण थंडगार पाण्याच्या बाटल्याही सोबत घेत आहेत.चिमूर नगरपरिषदेसाठी लोकसंख्या कमी पडत असल्याने ११ गावांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे नगरपरिषदेचा ११-११ किलोमीटरचा परिसर पडतो. यामध्ये १७ प्रभाग विभागले आहेत. त्यामध्ये अनेक प्रभाग विस्तारलेले आहेत. एका प्रभागात हजार ते पंधराशे मतदार आहेत. त्यामुळे एक प्रभाग दिड ते दोन किलोमीटरच्या परिघात विस्तारलेला आहे. मतदारापर्यंत पोहचताना उमेदवाराना शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.प्रचारासाठी सध्या सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर होत असला तरी पारंपरिक फेऱ्याचे आजही महत्त्व कायम आहे. (वार्ताहर)