शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी उमेदवार करत आहेत खास फोटो शूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 10:59 IST

खादीचा पांढरा कुर्ता आणि पायजमा...त्यावर जॅकेट...असा राजकीय नेत्याला साजेसा पेहराव करून उमेदवार खास पोर्टफोलिओ शूट करून घेत आहेत.

ठळक मुद्देव्यावसायिक छायाचित्रकारांना आले सुगीचे दिवस

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खादीचा पांढरा कुर्ता आणि पायजमा...त्यावर जॅकेट...असा राजकीय नेत्याला साजेसा पेहराव करून उमेदवार खास पोर्टफोलिओ शूट करून घेत आहेत. इतर उमेदवारांपेक्षा आपला प्रचार हटके आणि वेगळा व्हावा, यासाठी सगळे कामाला लागले असून सध्या वेगवेगळ्या थीमनुसार पोर्टफोलिओ शूट जोमाने सुरू आहेत. प्रचार फलकासह सोशल मीडियावर आपली छबी उठून दिसावी, यासाठी खास व्यावसायिक छायाचित्रकारांकडून पोर्टफोलिओ शूट करवून घेतला जात आहे. पोर्टफोलिओ शूटसह त्यांच्याकडून प्रचार रॅली, भेटीगाठींचे क्षण, प्रचार सभा यांची छायाचित्रेही काढून घेतली जात असल्याने सध्याला व्यावसायिक छायाचित्रकार जोमात आहेत.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारांचा कल पोर्टफोलिओ शूटकडे वाढला आहे. आऊटडोरपेक्षा उमेदवाराच्या बंगल्यात, घरात किंवा स्टुडिओमध्ये हे पोर्टफोलिओ शूट केले जात आहेत. काही उमेदवारांनी तर विजयी झाल्याचे पोर्टफोलिओदेखील शूट केले आहेत. या कामात दोन ते तीन जणांची टीम पूर्ण सेटअपसह छायाचित्रे काढून देत आहेत.

दैनंदिन प्रचाराचेही छायाचित्रणरोजच्या प्रचाराची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली जात आहेत. प्रचार रॅली, भेटीगाठी, प्रचार सभा आणि मतदारांशी संवाद, असा उमेदवारांच्या प्रचाराचा प्रत्येक क्षण छायाचित्रकार शूट करून देत आहेत. ही रोजची छायाचित्रे फेसबुक, इन्स्ट्राग्राम आणि टिष्ट्वटरवर टाकले जात असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही छायाचित्रे पाठवली जात आहेत.

सोशल मीडियासाठी खास शूटफेसबुक अकाऊंट, फेसबुक पेज, इन्स्ट्राग्राम पेज, टिष्ट्वटर अकाऊंट आणि उमेदवाराचे संकेतस्थळ, यासाठीच्या डीपीसाठी आणि कव्हर पिक्चरसाठी पोर्टफोलिओ शूटची मागणी जास्त आहे. रोज नवनवीन डीपी ठेवता यावेत आणि त्यातून आपला वेगळ्या पद्धतीने प्रचार व्हावा, यासाठी हे शूट करण्यात येत आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019