शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यााने उदरनिर्वाहाचे साधन हिरावले

By admin | Updated: August 1, 2014 00:13 IST

इंदिरासागर गोसेखूर्द धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असले, तरी दुसरीकडे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मरण ठरले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना

ब्रह्मपुरी : इंदिरासागर गोसेखूर्द धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असले, तरी दुसरीकडे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मरण ठरले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जमीन अधिग्रहीत करताना प्रकल्पग्रस्तांना आश्वासने देण्ययात आली. मात्र, आश्वासने फोल ठरली आहेत.गोसेखूर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात भूज येथील २५ ते ३० अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, या शेतकऱ्यांना जमिनीचा समाधानकारक मोबदला मिळालेला नाही. एकरी अडीच लाख रुपये आणि दुसरीकडे शेतजमीन देऊ असे आश्वासन देण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी जमिनी विकल्या. परंतु आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. दिलेल्या आश्वासनांप्रमाणे दुसरी जमीन देण्यात यावी, अथवा एकरी पाच लाख रुपये दर ठरवून उर्वरित रक्कम देण्यात यावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.गोसेखुर्द प्रकल्पाचे दोन मुख्य कालवे असून उजव्या कालव्यामध्ये भूज येथील २५ ते ३० शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. या कालव्याचे तीनवळा सर्वेक्षण करण्यात आले. अगोदरच्या सर्वेक्षणात कोणत्याही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या नव्हत्या. माात्र शेवटी सर्वेक्षण बदलून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीमधून कालवा काढण्यात आला. याच बरोबर मिळणारा मोबदलाही अत्यल्प देण्यात आला.उजव्या कालव्याला जोडूनच चार नंबरचा उपकालवा काढण्यात आला. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्यांना मात्र एकरी ४.९४ लाख रुपये मोबदला देण्यात आला. त्यामुळे भूज येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी असंतोष व्यक्त करीत आहेत. जमीनच कालव्यात गेल्याने मजुरीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. जोपर्यंत वाढीव रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत फेरफारच्या कागदावर स्वाक्षरी करणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)