शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर पोस्टाचा परिसर झाड-फुलांनी बहरला

By admin | Updated: August 26, 2016 00:55 IST

कर्मचाऱ्यांमध्ये कल्पना, आपण ज्या कार्यालयात काम करतो, तो परिसर देखणा सुंदर असावा, याकरिता त्यांची आवड व धडपड

डेरेदार वृक्ष : कर्मचाऱ्यांच्या कल्पना शक्तीचा अविष्कारबल्लारपूर: कर्मचाऱ्यांमध्ये कल्पना, आपण ज्या कार्यालयात काम करतो, तो परिसर देखणा सुंदर असावा, याकरिता त्यांची आवड व धडपड आणि त्याकरिता हातात घेतलेल्या कामात सर्वांचा सहभाग, सातत्य असले की, तो परिसर कसा फुलते, बहरतो आणि येणाऱ्या प्रत्येकाला तो कसा प्रफुल्लत करतो, याचे चांगले उदाहरण बल्लारपूर येथील पोस्टाचा झाड- फुलांनी बहरलेला परिसर आहे.बल्लारशाह रेल्वे स्टेशन मागे, चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावरील हे पोस्ट आॅफीस स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. चारही बाजूंनी भिंत असलेला पोस्ट आॅफीसचा परिसर खुप मोठा आहे. या मोकळ्या जागेला शोभिवंत झाड व फुलांनी बहरविण्याची कल्पना १५-१६ वर्षापूर्वी तत्कालीन पोस्टमास्तर कुंभारे आणि त्यांचे सहकारी राजू धानफुले, रमा यांच्या मनात आली. या कल्पनेला मूर्तरुप देण्याकरिता त्यांनी चंद्रपूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून या कामी मदत मागितली. या कल्पक व चांगल्या कामाला सर्वांकडून मदत मिळून परिसर झाडा-फुलांनी बहरविण्याच्या कामाला सुरुवात झाली. परिसरात विहीर असून पाण्याची चांगली सोय आहे. कर्मचारी या वृक्षवेलींची काळजी घेतात. यामुळे भर उन्हाळ्यातही हा परिसर हिरवागार आणि निरनिराळ्या फुलांच्या रंगानी बहरलेला असतो. या सोबतच, छाया देणारे डेरदार वृक्षही आहेत. रस्त्याच्या दोन्ही कडेला मेहंदीची झाडं आणि परिसर स्वच्छ असल्यामुळे या कार्यालयाच्या परिसरात प्रसन्नता मिळते.वृक्षांना मुबलक पाणी आणि त्यांची योग्य निगा, यामुळे हिवाळा- उन्हाळ्यात ही झाडे-फुले टवटवीत असतात. श्रावण हा तर हिरव्या श्रीमंतीचा महिना असतो. त्यामुळे या घडीला हा परिसर हिरव्या नवलाईने मोहक फुलांनी न नटला तर नवलच! (तालुका प्रतिनिधी)