शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

केबल आॅपरेटरला २१ लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 00:49 IST

जिल्हा वितरण बनविण्याचे सांगत एका केबल आॅपरेटरची २१ लाख रुपयांनी फसवणूक केली

दोघांना अटक : शनिवारपर्यंत पोलीस कोठडीचंद्रपूर : जिल्हा वितरण बनविण्याचे सांगत एका केबल आॅपरेटरची २१ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आज गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.स्वप्नील पेठे व रितेश श्रीवास्तव अशी आरोपींची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी केबल आॅपरेटरांची एक सभा पार पडली होती. या सभेत घुटकाळा येथील रहिवासी प्रशांत ताकसांडे याची भेट जगन्नाथबाबा नगरातील स्वप्नील पेठे व नागपूर येथील रितेश श्रीवास्तव यांच्याशी झाली. आरोपींनी प्रशांतला विश्वासात घेऊन जिल्हा वितरक बनविण्याचे आमिष देत दोनवेळा नऊ-नऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा तीन लाख रुपये आरोपींनी प्रशांतकडून घेतले. मात्र पैैसे देऊनही काम न झाल्याने प्रशांत आपले पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी पैसे देण्यान नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशांत ताकसांडे यांंनी स्वप्नील पेठे व रितेश श्रीवास्तव यांच्याविरुध्द शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुध्द कलम ४२०, ४८८, ४७५, ५२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यादरम्यान, आरोपीकडून आणखी काही माहिती मिळते का, याचा तपास करण्यात येईल, असे पोलीस उपनिरीक्षक बी.एम. वाकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)