शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनातून मिळालेले बसस्थानक अडगळीत

By admin | Updated: October 1, 2015 01:27 IST

नागभीड तालुक्याच्या निर्मितीनंतर नागभीडमध्ये एस.टी. आगाराच्या मागणीसाठी एकच मोठे आंदोलन झाले.

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड तालुक्याच्या निर्मितीनंतर नागभीडमध्ये एस.टी. आगाराच्या मागणीसाठी एकच मोठे आंदोलन झाले. या आंदोलनातून मिळालेले बसस्थानक आता अडगळीत पडले आहे. तत्कालीन पुढाऱ्यांच्या विवेकशुन्य नियोजनाचा हा परिपाक असून या बसस्थानकाचा वापर अवैध कामासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.नागभीड हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने नागभीड येथे बस आगार असावे, या मागणीसाठी नागभीड येथे एक मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाची तिव्रता एवढी मोठी होती की आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. बस आगाराच्या मागणीची तिव्रता लक्षात घेऊन या ठिकाणी बसस्थानक मंजूर करण्यात आले. पण येथेही नागभीडकरांचे दुर्दैव आड आले.बसस्थानकास मंजुरी मिळाल्यानंतर ते पंचायत समितीजवळील रेल्वेच्या जागेत होईल, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा होती. जेणेकरून रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक जवळजवळ होतील आणि ते प्रवाशांच्या सोयीचे होईल. पण झाले उलटेच. सदर बसस्थानक गावाच्या पश्चिमेला आणि तेव्हाच्या निर्जनस्थळी बांधण्यात आले. बसस्थानक बांधण्यात आल्यानंतर पहिली एक दोन वर्ष तिथे बसेस गेल्याही. पण फालतू वेळेचा अपव्यय होत आहे अशी ओरड झाल्यानंतर तिथे बसेस जाणेच बंद झाले. आज लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बसस्थानक अडगळीत पडले आहे. बसस्थानक अडगळीत पडले असले तरी आजही प्रवासी नागपूर-चंद्रपूरला प्रवास करतात, तेव्हा तिकीट आकारणीत या टप्प्याचा विचार करूनच तिकीट आकारल्या जात असल्याची माहिती आहे. म्हणजे उपयोग नसलेल्या या बसस्थानकाचा भूर्दंडही सामान्य नागरिकच सोसत आहेत. जर संपुर्ण विचार करून या बसस्थानकाची निर्मिती रेल्वेच्या जागेत किंवा टी पाईंटवर करण्यात आली असती तर ते नागभीडकरांना अतिशय सोयीचे झाले असते आणि आज अडगळीत पडलेले बसस्थानक पकडून चार ठिकाणी बसथांब्याची निर्मिती करावी लागली, ती करावी लागली नसती. आंदोलनातून मिळालेल्या या बसस्थानकाचा आता कोणताही उपयोग नाही. उलट समाज विघातक शक्तींचे ते आश्रयस्थान बनल्याची चर्चा आहे. येथील नेतृत्वाने या बसस्थानकाचा उपयोग अन्य शासकीय कार्यालयासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी होत असते.