शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांवर कागदी घोड्यांचा भार

By admin | Updated: December 25, 2014 23:29 IST

चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते. परंतु, या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडी सेविकांवर अनेक

चंद्रपूर : चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते. परंतु, या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडी सेविकांवर अनेक कामे लादल्या जात आहेत. तुटपुंजा मानधनावर त्यांना ही सगळी कामे करावी लागत असल्यामुळे सेविकांत असंतोष वाढला आहे. शासनाच्या शैक्षणिक योजनेंतर्गत अंगणवाडीमध्ये लहान मुलांना बोलके करण्याकरिता व अक्षर ओळख करण्याकरिता आंगणवाडी सेविका करीत आहेत. केंद्र व राज्यशासन मिळून अंगणवाडी सेविकेला ५ हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकेला २४५० रुपए, अंगणवाडी मदतनिसांना २५०० रुपये मानधन दरमहा दिले जात आहे. मात्र शिकवणीच्या कामाव्यतीरिक्त अंगणवाडी सेविकेला आरोग्य विभागाशी संबंधित सर्वेक्षणाची व अन्य कामे दिली जात आहेत. वेळोवेळी बाहेरगावी सभा, मेळाव्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सेविकेला मुलांना सांभाळणे त्यांना आवश्यक असणाऱ्या प्राथमिक शिक्षणाच्या कामात बाधा येत आहे. अंगणवाडीमुळे मुलांमधील कुपोषितपणा दूर करण्यास मोठी मदत होत आहे. मात्र आंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामाव्यतिरीक्त दर महिन्याला इतर कामे करावी लागत असल्याने कुपोषणमुक्तीच्या उद्देशाला हरताळ फासली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)