शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पूजेसाठी आर्जव करून बोलवावे लागले बैल

By admin | Updated: September 14, 2015 00:47 IST

इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे.

यांत्रिकीकरणाचा परिणाम : बैलांची संख्या झाली कमीनागभीड : इतर क्षेत्रासोबतच शेतीमध्येही यांत्रिकीकरणाचा प्रवेश झाल्याने साहजिकच बैलांची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम यावर्षी गावखेड्यातील पोळ्यात जाणवला. नागभीडमध्ये तर अनेक कुटुंबांना बैलाच्या पुजेसाठी तासन्तास प्रतिक्षा करावी लागली. तर अनेकांवर बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून पूजा करावी लागली.शनिवारी सर्वत्र पोळा सण साजरा झाला. तसा तो नागभीड मध्येही साजरा करण्यात आला. एकेकाळी नागभीडच्या पोळ्याची पंचक्रोशीत ख्याती होती. संबंध बाजार चौक पोळ्याच्या दिवशी बैलांनी फुलून असायचा. प्रत्येक शेतकरी आपआपल्या कुवतीप्रमाणे बैल सजवून पोळ्यात आणायचा आणि सजवलेले हे बैल बाजार चौकाची वेगळीच शोभा वाढवायचे. बैलांच्या गळ्यातील घुंगर तसेच घोल्लरांच्या आवाजाने तर या शोभेला वेगळीच लय यायची. संध्याकाळच्या वेळेस पोळा फुटल्यानंतर आवाजाच्या या लयीला आणखीच गती यायची. अगदी झुंजु भुंजु होईपर्यंत शेतकरी आपले बैल घरोघरी न्यायचे आणि यथा सामग्र प्रत्येक घरी या बैलांची पुजा व्हायची. एकेका घरी दहा ते बारा जोड्या या हमखास यायच्याच आणि प्रत्येक जोडीची पूजासुद्धा तेवढ्याच उत्साहाने व्हायची.पण आता काळ बदलला आणि या काळाबरोबरोबर काळाच्या व्याख्या सुद्धा बदलल्या. शेतीमध्ये यांत्रिकीरणाचा प्रवेश झाला. जी शेती केवळ बैलांच्या भरवशावर केली जायची त्या शेतीत आता विविध प्रकारची यंत्रे दिसू लागली. परिणामी शेतीतून बैल हद्दपार होऊ लागले. याशिवाय पडीत जमिनी, कुरणे आणि वनकायद्यामुळे चऱ्हाटीची जागा कमी झाल्याने गोधन पाळण्यावरही अनेक मर्यादा आल्या आणि यातून बैलांची निर्मिती थांबली.या सर्वांचा परिणाम आता पोळ्यावर दिसू लागला आहे. आणि म्हणूनच मोठ्या शहर व महानगराचे लोन आता नागभीडसारख्या गावातही पोहोचले. त्याचाच परिणाम म्हणून बैलांच्या पूजेसाठी लोकांना एकतर प्रतिक्षा करावी लागली किंवा बैलधारकांना आर्जव करून घरी बोलावून बैलांची पूजा करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)