शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम सभापतीकडून युवकास मारहाण

By admin | Updated: August 29, 2016 01:21 IST

येथील नगर पंचायतीचे बांधकाम सभाती राकेश पून यांनी उधारीचे पैसे न दिल्याच्या संतापातून एका तरुणाला मारहाण केली.

गोंडपिंपरी नगर पंचायत : पोलिसात तक्रार; कारवाईस मात्र विलंबगोंडपिपरी : येथील नगर पंचायतीचे बांधकाम सभाती राकेश पून यांनी उधारीचे पैसे न दिल्याच्या संतापातून एका तरुणाला मारहाण केली. त्याला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणाने पोलीस अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र कार्यवाहीस विलंब होत असल्याचा आरोप अमित अलोणे या तरुणाने पत्रकार परिषदेतून केला आहे.कोंढाणा येथील अमित अलोणे यांनी पोलीस अधीक्षकाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, बल्लारपूर येथील एका सोसायटीअंतर्गत गोंडपिपरीत गेल्या चार वर्षापासून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र अमित चालवित आहे. केंद्रासाठी लागणारे विविध साहित्य त्याने येथील पायल इलेक्ट्रानिक्स मधून खरेदी केले. राकेश पूनचे मामा निलेश संगमवार हे पायल इलेक्ट्रानिक्सचे संचालक आहेत. राकेश पून हे देखील दुकान चालवितात. या दुकानातून अलोणे यांनी २१ हजार रुपयाचे साहित्य खरेदी केले. १५ हजार रुपये नगदी जमा केले व उर्वरित सहा हजार रुपये उधारीत ठेवले. पून यांनी ते मान्य केले. वर्ष लोटूनही अलोणे यांनी उधारीची रक्कम न दिल्याने निलेश संगमवार व राकेश पून हे संतापले होते. ५ आॅगस्ट रोजी अलोणे हा बोम्मावार महाविद्यालयात बसून असताना पायल इलेक्ट्रानिक्समधील नौकर तिथे पोहचले व पैशाची मागणी करू लागला. अलोणे याने १० ते १५ आॅगस्ट रोजी पैसे देण्याचे सांगितले. मात्र नौकराने फोनवरुन राकेश पून यांना बोलाविले. यानंतर पून याने जातीवाचक शिवीगाळ करीत ६० मीटर पर्यंत खेचत दुकानात नेले व तिथे संगमवार व पून यांनी अलोणे यास मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे म्हटले आहे.या प्रकारानंतर अलोणे यांनी सदर प्रकाराबाबत पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली. त्यांनी हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडे वर्ग केले. मात्र बराच कालावधी लोटूनही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे अमित अलोणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (शहर प्रतिनिधी)मद्यविक्रेत्यांना अटकचंद्रपूर : अवैध दारूविक्री करताना पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून ९७ हजार ८०० रूपयाचा माल जप्त करून नऊ मद्यविक्रेत्यांना अटक केली. या कारवाईने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.