शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन वाघ समोर असताना म्हशीनेच वाचविले मालकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

जनावरे चराई करत असताना, बऱ्याच वेळाने  तीन वाघ समोर येऊन उभे ठाकले. प्रसंगावधान राखून त्याने लगत असलेल्या झाडावर  चढला. त्यानंतर, एका म्हशीने आक्रमकता दाखवत  एका वाघाचा एका किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. तो पट्टेदार वाघ पळून गेला. नंतर दोन वाघ झाडाखाली बसून होते. सोबत असलेले बैल सैरावैरा पळाले. दरम्यान, म्हैस येऊन त्या दोन्ही वाघांकडे बघत राहिली. वाघ म्हशीकडे बघत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कसावली :  मानव व वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असल्याचे नेहमीच होणाऱ्या घटनेवरून  दिसून येत आहे. अशीच एक घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोंडेखल गावाला लागून असलेल्या शिवारात घडली.एका शेतकऱ्यासमोर चक्क तीन वाघ उभे ठाकले. लगेच शेतकरी झाडावर चढला. याच वेळी एका म्हशीने झाडावर चढलेल्या आपल्या मालकाचे प्राण वाचविले.तालुक्यातील कोंडेखल येथील  शेतकरी लोकेश अंबादास भोयर  आपली पाळीव जनावरे घेऊन नवतलाव परिसर असलेल्या स्वत:च्या शेतात चराईसाठी गेला. जनावरे चराई करत असताना, बऱ्याच वेळाने  तीन वाघ समोर येऊन उभे ठाकले. प्रसंगावधान राखून त्याने लगत असलेल्या झाडावर  चढला. त्यानंतर, एका म्हशीने आक्रमकता दाखवत  एका वाघाचा एका किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. तो पट्टेदार वाघ पळून गेला. नंतर दोन वाघ झाडाखाली बसून होते. सोबत असलेले बैल सैरावैरा पळाले. दरम्यान, म्हैस येऊन त्या दोन्ही वाघांकडे बघत राहिली. वाघ म्हशीकडे बघत होता. तोपर्यंत शेतमालक झाडावर चढून हे दृश्य  पाहतच होता. घाबरलेल्या  अवस्थेत असलेल्या मालकाने गावातील नागरिकांना फोन केला. गावातील ७० ते ८० नागरिकांनी लगेच  शेताकडे धाव घेतली, तोपर्यंत वाघ झाडाखाली बसून  होते.   गावकऱ्यांचा आवाज ऐकू येताच, दोन्ही वाघ जंगलाच्या दिशेने पळाले. नशीब बालवत्तर होते, म्हणून त्या युवा शेतमालकाचे प्राण वाचले. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या इसमाला ग्रामस्थांनी  खाली उतरवले. नंतर वन समितीच्या अध्यक्षांनी वनविभागाला याबाबत माहिती देत बंदोबस्त करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Tigerवाघ