शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस बंद राहिली बीएसएनएलची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:02 IST

मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मागील दोन दिवस भारत संचार निगमची सेवा पूर्णपणे बंद आहे. सोमवारच्या रात्री १० वाजेपासून बंद झालेली ही सेवा बुधवारी ३ वाजता सुरू झाली. परिणामी नागरिक त्रस्त झाले. निगमने आपली सेवा त्वरित सुधारावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.नागभीड येथे इतर मोबाईल कंपण्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विस्तारले असले तरी बीएसएनएलचेही ग्राहक मोठया प्रमाणावर आहे.हे ग्राहक पूर्णपणे बीएसएनएलवर अवलंबून असले तरी बीएसएनएलच्या टुकार सेवेने चांगलेच त्रासून गेले आहेत.गेली दोन दिवस या सेवेने तर चांगलाच कहर केला. इंटरनेट आणि भ्रमनध्वनी या दोन्ही सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या. बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराची कल्पना नसलेले अनेक मोबाईलधारक आपलाच मोबाईल खराब झाला असेल, अशी समजूत करून वारंवार मोबाईलमधील सीमकार्ड काढून ते स्वच्छ करून परत मोबाईलमध्ये टाकत होते. काही ग्राहक मोबाईल बंद करून परत सुरू करीत राहिले. ही स्थिती पाहून बीएसएनएल ग्राहकांना सेवा देत आहे की ग्राहकांच्या डोक्याला ताप हेच समजेनासे झाले होते. गेल्या काही वर्षात ग्राहकांना अशीच सेवा मिळत गेल्याने अनेक बीएसएनएलच्या ग्राहकांनी आपला सीमकार्ड दुसऱ्या कंपनीत परावर्तीत केली व करीत आहेत.आज अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच इंटरनेट आणि भ्रमनध्वनी या सेवा लोकांची आवश्यक गरज बनली आहे. बीएसएनएलने आपल्या सेवेत सुधारणा करावी, अशी ग्राहकाची मागणी आहे. दरम्यान यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या सेवेत मोठा बिघाड निर्माण झाल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यात ही सेवा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.