शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर होणार विकासाचे ‘हब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

आदिवासी व गोरगरिबांना जगण्याचे साधन देणाऱ्या या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्हणून पुढे येणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची हे गार्डन उभारण्यामागील दूरदृष्टी किती प्रभावी आहे, हे प्रकर्षाने जाणवते.

ठळक मुद्देसंडे एंकर। देशातील अत्याधुनिक गार्डन, वनमंत्र्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात काही बाबींचा विकास एवढा व्यापक झाला आहे की त्या विकासकामाची ख्याती राज्यभरात होत आहे. बल्लारपूरचे बसस्थानक, ताडोबाचा विकास, बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी ही अशी काही उदाहरणे आहे. मात्र विसापूर येथे होत असलेले बॉटनिकल गार्डन तर थेट देशभरात नावारुपास येणारे आहे. देशातील अत्याधुनिक असे हे गार्डन असणार आहे. आदिवासी व गोरगरिबांना जगण्याचे साधन देणाऱ्या या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्हणून पुढे येणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची हे गार्डन उभारण्यामागील दूरदृष्टी किती प्रभावी आहे, हे प्रकर्षाने जाणवते.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून घेतलेल्या जबाबदारीमागील दूरदृष्टी सांगणारा प्रकल्प म्हणजे विसापूर येथील बॉटनिकल गार्डन. विदर्भात विशेषत: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्र हे उत्तम निसर्ग वन आणि जैव विविधतेने संपन्न आणि समृध्द असे क्षेत्र आहे. या निसर्ग वैभवाला या क्षेत्रामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. राज्य शासनाच्या १६ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विसापूर येथे जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्याचा संकल्प केला आहे. सदर प्रकल्पाची योजना राबविण्याकरिता राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनऊ या संस्थेची या प्रकल्पाच्या तांत्रिक कामात मदत होणार आहे.तीन विभागात गार्डनची निर्मितीयाप्रकल्पांतर्गत बॉटनिकल गार्डन, कन्झर्वेशन झोन आणि रिक्रिएशन झोन अशा तीन विभागामध्ये उद्यान तयार होत आहे. नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्युट लखनऊ यांच्या मार्फतही बरीच कामे सुरू करण्यात आली. वनस्पती शास्त्रातील आंतरराष्ट्रीय विद्या शाखांचा व्यापक दृष्टिकोन लक्षात घेवून प्रकल्पांतर्गत घटकांची विविध कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.गार्डनमधील ही कामे आहेत प्रगतीपथावरतसेच वनविभागामार्फत रोपवन कामे, निरीक्षण पथ, जल व मृद संधारणाची कामे, वॉच टॉवर पूल, रस्ते, जलाशय, सुशोभिकरण, सिमेंट नाला बांध, ट्री हाऊस व इतर कामे प्रगतीपथावर आहेत. जागतिक दर्जाचे इन्स्टिट्युट आपल्या विभागात उभे राहिल्यास त्या भागाच्या सार्वत्रिक उत्कर्षाला सुरूवात झाली आहे.वनप्रबोधनी देणार अधिकाऱ्यांना प्रशिक्षणवनसंपदा व वनेत्तर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्यासक, विद्यार्थी या गार्डनला भेट देणार आहेत. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यासाठी डेहराडून संस्थेप्रमाणे एखादी संस्था जिल्ह्यात असावी, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वाटले. लागलीच त्यांनी चंद्रपूर येथे राष्ट्रीय दर्जाची वनप्रबोधनी उभारण्याचा निर्णय घेतला. आता ही वनप्रबोधनी चंद्रपुरात उभारली जात आहे. तिच्या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही वनप्रबोधनीच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना प्रशिक्षण देणार आहे.या घटकांचा असणार समावेशफुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्याबाबतचे प्रशिक्षण हे या राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था, लखनऊ संस्थेच्या सहभागाचा मुख्य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरियम, बीज संग्रहालय, बोन्साय गार्डन, बोगनवेलिया गार्डन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी व गरीब लोकांना जगण्याचे साधन निर्माण होणार आहे.ताडोबातील पर्यटकांना पडेल भुरळताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात. अशातच देशातील अत्याधुनिक बॉटनिकल गार्डन जवळच राहणार असल्याने या वनस्पती उद्यान या देश-विदेशातील पर्यटकांनाही भूरळ घालेल, हे निश्चित. त्यामुळे पर्यटक या गार्डनला आवर्जून भेट देतील. त्या दृष्टीनेच या बॉटनिकल गार्डनचा नाविण्यपूर्ण विकास केला जात आहे.