शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरीवर मद्यपींची वक्रदृष्टी

By admin | Updated: September 19, 2015 01:32 IST

रमनीय आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून अख्ख्या विदर्भात प्रसिद्ध पावलेल्या आणि पावसाळ्याच्या ...

नागभीड : रमनीय आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून अख्ख्या विदर्भात प्रसिद्ध पावलेल्या आणि पावसाळ्याच्या दिवसात रोज हजारो पर्यटकांची गर्दी खेचणाऱ्या घोडाझरी या पर्यटन स्थळावर आता दारूबाजांची वक्रदृष्टी पडली आहे. पर्यटनाऐवजी दारूचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या या आंबटशौकीन पर्यटकांचा महिला आणि इतर पर्यटकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या आणि एका बाजूला मानवनिर्मित भिंत घालून तयार करण्यात आलेला घोडाझरी तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रोज होत असलेली गर्दी लक्षात घेतली तर या आकर्षणाची प्रचिती येते. केवळ पर्यटनच नाही तर या भागातील सिंचनाची गरज लक्षात घेऊन इंग्रजांनी या तलावाची निर्मिती केली. ज्या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली, ते दोन्ही उद्देश १०८ वर्षानंतरही साध्य होत आहेत. या तलावाच्या माध्यमातून नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील १२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.चहुबाजूने घनदाट जंगल आणि मध्ये तलाव यामुळे या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पावसाळ्याच्या दिवसात या सौंदर्याला अधिकच बहार येते. तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला की, हे नैसर्गिक सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी रोज होणारी हजारोंची गर्दी याचीच साक्ष आहे.असे असले तरी गेल्या काही दिवसांत या पर्यटकांसोबतच काही आंबट शौकीन पर्यटकांनीही या ठिकाणी गर्दी करणे सुरू केले आहे. दारूचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या स्थळाचा हे आंबट शौकीन चांगलाच फायदा करून घेत आहे. केवळ आसपासच्या गावातीलच पर्यटकांचा यात समावेश नाही तर चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांचाही यात समावेश आहे. येताना सोबत दारूचा साठा घेवून येणे, असा नित्यक्रमच या ठिकाणी झाला आहे. दारूच्या या प्रकारामुळे सभ्य आणि महिला पर्यटकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत तर आहेच, पण त्याचबरोबर घोडाझरी या पर्यटन स्थळाचे पावित्र्यही नष्ट होत आहे. येथे होत असलेली गर्दी लक्षात घेता आणि या प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)