शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या अफवेने पोलिसांची तारांबळ

By admin | Updated: September 6, 2014 01:41 IST

गुरुवारी रात्री ९ वाजताची वेळ, गिरनार चौकाच्या अलीकडे कस्तुरबा मार्गावर अचानक एक दोरीने बांधलेली सुटकेस बेवारस अवस्थेत सापडते.

चंद्रपूर : गुरुवारी रात्री ९ वाजताची वेळ, गिरनार चौकाच्या अलीकडे कस्तुरबा मार्गावर अचानक एक दोरीने बांधलेली सुटकेस बेवारस अवस्थेत सापडते. अचानक या सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरते. याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली जाते. गणेशोत्सव सुरू असल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडते. लगेच घटनास्थळी पोलिसांचा ताफा येतो. त्यांनाही सुटकेसमधून कशाचे तरी सिग्नल मिळते आणि मग सर्वांची भंबेरी उडते. निर्जनस्थळी सुटकेस नेऊन उघडल्यानंतर त्यात कपडे आणि मोबाईल मिळाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडतो. वरकरणी हा प्रकार गंमतीचा वाटत असला तरी या प्रकारामुळे तब्बल अडीच तास लोकांचा श्वास अडकून पडला होता.२९ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. रस्त्यारस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अनूचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाला अलर्ट करण्यात आले आहे. अशातच काल गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चंद्रपुरातील वर्दळीच्या गिरनार चौकाच्या अलिकडे १०० मीटर अंतरावर एक दोरीने बांधलेली काळी सुटकेस बेवारस पडलेली नागरिकांना दिसली. कोणतीही बेवारस वस्तू दिसली की पोलिसांना फोन करा, अशा आशयाचे फलक शहरात लावले असल्याने नागरिकांनी लगेच याबाबत पोलिसांना कळविले. तोपर्यंत सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा सर्वत्र पसरली. प्रारंभी घटनास्थळी काही पोलीस आले. त्यांनी लगेच बॉम्ब डिस्पोजल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गरभिये यांना पाचारण केले. तेदेखील श्वानपथक व आपल्या ताफ्यासह तिथे पोहचले. बॉम्ब डिटेक्टरने तपासणी केली असता सुटकेसमधून सिग्नल मिळाले. त्यामुळे पोलिसांसह सर्वांचीच भंबेरी उडाली. दरम्यान यावेळपर्यंत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचला नव्हता. त्यामुळे बराच वेळ ही सुटकेस तिथेच पडून राहिली. एव्हाना नागरिकांचीही प्रचंड गर्दी घटनास्थळी जमा झाली. काही वेळानंतर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर घटनास्थळी पोहचले. त्यांनी सुटकेसची पाहणी केल्यानंतर लगेच ही सुटकेस निर्जनस्थळी नेण्याचे आदेश दिले. तोपर्यंत रात्रीचे ११ वाजून गेले होते. त्यानंतर सुटकेस कोहीनूर क्रीडांगण (पूर्वीचे कोनेरी तलाव) येथे नेण्यात आली. तिथे बॉम्ब डिस्पोजल पथकाद्वारे सुटकेस उघडण्यात आली. सुटकेसमध्ये जुने मळलेले कपडे व सीमकार्ड नसलेला जुना मोबाईल आढळला. त्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. (शहर प्रतिनिधी)