शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस चिटफंड कंपन्या करताहेत नागरिकांची लूट

By admin | Updated: September 13, 2015 00:53 IST

गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून आणि शासनाची परवानगी असल्याचे भासवून अनेक बोगस गुंतवणूक कंपन्या नागरिकांकडून कोट्यवधी रूपये जमा करीत आहेत.

शहर काँग्रेसचे निवेदन : कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचंद्रपूर : गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून आणि शासनाची परवानगी असल्याचे भासवून अनेक बोगस गुंतवणूक कंपन्या नागरिकांकडून कोट्यवधी रूपये जमा करीत आहेत. नागरिकांचा विश्वास संपादन करून अचानकपणे कार्यालयाला टाळे लावून कंपन्या फरार होण्याचेही प्रकार यापूर्वी घडल्याने प्रशासनाने अशा कंपन्याकर कारवाई करावी, अशी मागणी आहे.चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीने या संदर्भात अलिकडेच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देवून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मैत्रेय सर्व्हिीसेस प्रा. लिमि., मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर प्रा. लिमि., पीएएसएल, साई प्रकाश प्रापर्टीज डेव्हलपमेंट लिमि., कलकम गृप कंपनी, अनोडी कंपनी, समृद्धी जीवन कंपनी, जी-लाईफ कंपनी, जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंंडिया लिमि., रोसव्हॅली रियलइस्टेट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सिट्रस चिट इन. कंपनी या कंपन्यांसह एच.बी.एन. या कंपन्यांचा नामोल्लेख या तक्रारीत करण्यात आला आहे. या कंपन्या अवैध असून सेबीने (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड) जाहीर केलेल्या अवैध कंपन्यांच्या यादीमध्ये या कंपन्यांचा समावेश आहे. सेबीने अवैध जाहीर करूनही या कंपन्या मात्र चंद्रपूर जिल्ह्यात व्यवसाय करीतच आहेत. सेबीच्या या इशाऱ्यानंतरही प्रशासनाने या कंपन्यांवर कसलीही कारवाई केली नसल्याबद्दल या निवेदनातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. आर्थिक गुंतवणुकीचा व्यवसाय करण्यापूर्वी कंपन्यांकडे एमसीए प्रमाणपत्र, रिझर्व्ह बँकेचे प्रमाणपत्र, जिल्हा नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. मात्र या कंपन्यांकडे कागदपत्रे आणि प्रमाणपत्र नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)