शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदानाचा उपक्रम

By admin | Updated: July 2, 2015 01:18 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती उद्या २ जुलैला चंद्रपुरात रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून पार पडत आहे.

लोकमत-आयएमएचा उपक्रम : डॉक्टर्स डे अंतर्गत सामूहिक आयोजनचंद्रपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती उद्या २ जुलैला चंद्रपुरात रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमातून पार पडत आहे.लोकमत जिल्हा कार्यालय आणि इंंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या संयुक्त उपक्रमातून तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या सहकार्याने हे आयोजन होत असून यात शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थाही सहभागी होत आहेत. स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाजवळील आयएमए सभागृहात सकाळी ८ वाजता या शिबिराला प्रारंभ होत आहे.सकाळी ८ वाजता स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पाजंली अर्पण करून शिबिराला सुरूवात होईल. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतिनिमीत्त देशभरात १ जुलै हा डॉक्टर डे म्हणून पाळला जातो. तर, १ जुलै ते ७ जुलै हा डॉक्टर्स विक म्हणून पाळला जातो. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयएमएच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सामाजिक उपक्रम व्हावा, यासाठी आयएमएचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था या महारक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरसावल्या आहेत. या शिबिरासाठी वेळेवर उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. तरी रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक भुक्ते, सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद मुरंबिकर, जिल्हा समान्य रूग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे आणि चंद्रपूर लोकमत जिल्हा कार्यालयाने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)रक्तदात्यांना ओळखपत्र जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या सहकार्याने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. या सोबतच प्रमाणपत्र देऊन गौरवित केले जाणार आहे. शासकीय सुविधा असलेल्या १०४ टोल फ्रि क्रमांकावरील ‘ब्लड आॅन कॉल’ या योजनेअंतर्गत रक्तदात्याचे कार्ड दाखविल्यास मोफत रक्त दिले जाणार आहे. लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहनबाबूजींच्या जयंतीनिमीत्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात लोकमत सखी मंच आणि लोकमत युवा नेक्स्टच्या सर्व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.यांचा आहे सहभागरोटरी क्लब चंद्रपूर, महाराष्ट्र स्टेट मेडिकल रिप्रेंझेटेटिव्ह असोसिएशन चंद्रपूर (एमआर असोसिएशन), पुरूषोत्तमदास बागला होमियोपॅथी कॉलेज, सरदार पटेल महाविद्यालय, जगतगुरू व्यायाम शाळा, इको प्रो संघटना आदी.