शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार केवळ ‘घोषणाबाज’

By admin | Updated: April 13, 2017 00:38 IST

भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही.

अशोक चव्हाण : पत्रकार परिषदेत डागली तोफचंद्रपूर : भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी ढोल-ताशाचा गजर करून राज्य सरकारने सांस्कृतिक देखावा केला. भाजप सरकार अनुचित प्रथा सुरू करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, पक्ष निरीक्षक वजाहत मिर्जा, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, गजानन गावंडे, माजी आमदार सुभाष धोटे, राहुल पुगलिया, आसावरी देवतळे आदी उपस्थित होते.चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त चंद्रपुरात बुधवारी सायंकाळी त्यांची प्रचार सभा झाली. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेचा परिणाम म्हणून राज्य सरकार बँकांना एक लाख रुपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविली आहे. दुर्दैव असे की, कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारला उत्तर प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करावा लागत आहे. राज्याची स्थिती कुठे चाचली, हे कुणालाच ठावुक नाही. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याचा प्रेत ७ ते ८ तास झाडाला टांगून असते. याकडे दुर्लक्ष केले जाते. यापेक्षा दुर्दैव काय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. कर्जमाफी न देण्यासाठी राज्य सरकारने लावलेले तर्क हास्यास्पद असून तात्काळ कर्जमाफी देऊन आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास बँकाचा फायदा होणार असेल तर सावकारी कर्ज माफ करून त्यांना लाभ देण्याची काय गरज होती, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)मनपात काँग्रेसला चांगले यश मिळेलईव्हीएम मशिनबाबत नागरिकांना शंका आहे. शंका दूर करणे सरकार व प्रशासनाचे काम असून नागरिकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील सर्व पदाधिकारी नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात एकजुटीने काम करीत आहेत. याचा नक्कीच फायदा होणार असून भाजप सरकार फक्त घोषणा करीत आहे. पंचशताब्दी योजनेचा पैसा देण्याऐवजी योजनाच भाजपाने बंद केली. भूमीहिन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्याऐवजी रामदेव बाबा यांना नि:शुल्क जमीन दिली जात आहे, हा अन्याय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.