शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या समस्यांचा भाजप सरकारला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 01:24 IST

केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान सरकारने लोककल्याणाचा नारा दिला होता. विकासाचे स्वप्न दाखविले होते.

नरेश पुगलिया यांचा हल्लाबोल : बल्लारपुरात धरणे आंदोलन बल्लारपूर : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान सरकारने लोककल्याणाचा नारा दिला होता. विकासाचे स्वप्न दाखविले होते. मात्र सत्ता मिळताच देशातील व राज्यातील भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचा विसर पडला आहे, असा हल्लाबोल माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केला. बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने स्थानिक नगरपालिका चौकात शहरातील व तालुक्यातील जनतेच्या न्याय मागण्यासाठी सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, गजानन गावंडे, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, तारासिंग कलशी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, माजी नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, व्यंकटेश एम. बाल बैरय्या, अशोक नागापूरे, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती हरीष गेडाम, नगरसेवक नासीर खान, भास्कर माकोडे, विनोद आत्राम, इस्माईल ढाकवाला, वेणू गौरकार, न.प. गट नेता देवेद्र आर्य, वसंत मांढरे, गजानन दिवसे, चेतन गेडाम यांची उपस्थिती होती.नरेश पुगलिया पुढे म्हणाले, जिल्ह्यातील राज्याच्या मुख्यमंत्र्यासह तीन मंत्री केंद्रात व राज्यात आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे, राज्याचे अर्थ, नियोजन व वनखाते सांभाळणारे मंत्री आहेत. त्यांनी काही काळासाठी आकर्षीत करणाऱ्या घोषणा केल्या. आता मात्र केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. ही जनतेशी दगाबाजी आहे. आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे धोरण सरकार राबवित आहे. परिणामी तुम्ही घोषणाबाजी केलेल्या जनतेच्या न्याय मागण्या सोडवा, यासाठी आम्हाला आंदोलनातून सरकारला जागे करावे लागत आहे, असे सांगून पुगलिया यांनी भविष्यात जन आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी घनश्याम मुलचंदानी, रामभाऊ टोंगे, हरिष गेडाम, वसंत मांढरे, गजानन गावंडे यांची भाषणे झाली. संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार व्यंकटेश एम. बालबैरय्या यांनी मानले. यावेळी शहरातील व तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राज्य व केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला. (शहर प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांना २३ मागण्यांचे निवेदनबल्लारपूर शहर व तालुक्यातील तब्बल २३ न्याय मागण्यांचे निवेदन येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यात बल्लारपूर शहरासाठी जुनोना-कारवा-बामणी-बायपास मार्ग तयार करण्यात यावा, वनजमीनीवर अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात यावा, विसापूर गावासाठी उड्डान पूल बांधण्यात यावा, बल्लारपूर-विसापूर-नांदगाव- पठानपुरा मार्गाचे रुंदीकरण करुन द्विभाजक करण्यात यावा, वनउद्यानाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, रमाई घरकुल योजनेच्या धर्तीवर आर्थिक कमकुवत घटकांना घरकुल योजना सुरु करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.