शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आघाडीची आगेकूच ?

By admin | Updated: September 20, 2014 23:46 IST

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सत्तास्थापनेच्या या खेळात भाजपा आणि काँंग्रेस हे दोघेही गुंतले असले तरी

मिनी मंत्रालयाचा राजरंग : राकॉला बाहेर ठेवून भाजपा साधणार डाव ?चंद्रपूर : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सत्तास्थापनेच्या या खेळात भाजपा आणि काँंग्रेस हे दोघेही गुंतले असले तरी २९ चे संख्याबळ जुळविताना आणि ते सभागृहात टिकवून ठवताना सर्वाचीच धावाधाव सुरू आहे.५७ सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसकडे २१ तर भाजपाकडे १८ सदस्य आहेत. अर्थात निवडणुकीतील सुत्रेही या दोन्ही पक्षांकडेच आली आहेत. राष्ट्रवादीकडे ७ सदस्य असूनही ओबीसी प्रवर्गातील सदस्य नसल्याने उपाध्यक्षपदाचीच अपेक्षा त्यांना आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राकाँची आघाडी होण्याची शक्यता असून या दोन्ही पक्षातील नेते या निवडणुकीत जवळ आले आहेत. असे असूनही हे संख्याबळ २९ वर पोहचत नाही. पुन्हा दोन सदस्य आपल्या तंबुत दाखवा, तरच विजयाची हमी बाळगू, असा आग्रह राकॉकडून सुरू आहे. काँग्रेसने अन्य पक्षातील चार सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असला तरी राकॉ यावर विश्वास ठेवायला तयार नाही. या बेबनावामुळे सभागृहात नेमके काय घडेल, हे सांगता येत नाही.राष्ट्रवादीने आपले सातही सदस्य रिमोटमध्ये असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सदस्यांची बैठक रात्री उशिरा नागपुरात होत आहे. चित्रा डांगे आणि ज्योती जयस्वाल ही नावे काँग्रसमध्ये चर्चेत असली तरी अद्याप उघडपणे सांगण्यात आलेली नाहीत. सहा वाहनातून सहलीसाठी निघालेले काँग्रेसचे सर्वच सदस्य एकत्र असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत असले तरी एक वाहन युवाशक्तीच्या गावाकडे भरकटल्याच्या वृत्ताने आघाडीचा रक्तदाब वाढला आहे.या दोघांची आघाडी झाली तरी एका सदस्याची गरज पडणार आहे. त्यासाठी चार सदस्य संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केला आहे. अध्यक्षपद आणि दोन सभापतीपदे काँग्रेसने ठेवून उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद मिळावे अशी अपेक्षा राष्ट्रवादीची आहे.या चढाओढीत भाजपा पुढे असल्याचे संकेत आहे. शिवसेना, मनसे, बसपा आणि युवा शक्ती असे मिळून २९ चे संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा भाजपाचा आहे. एवढेच नाही तर काँग्रेसमधील चार सदस्यही आपल्या वाटेने असल्याचे या गोटातून सांगितले जात आहे. संध्या गुरुनुले आणि कल्पना बोरकर यांची नावे भाजपाकडून अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.गेल्या टर्ममध्ये हे बहुतेक पक्ष भाजपासोबत असल्याने या वेळीही सभागृहात मदत मिळेलच, असा विश्वास भाजपाला वाटत आहे. असे असले तरी केवळ एक मत निर्णायक ठरणार असल्याने या मताकडे दोन्हीकडील नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत. उपाध्यक्षपदाची निवडणुकही सोबतच होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील निकालावर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)