शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

न लावलेल्या वृक्षांसाठी कोट्यवधीची उधळपट्टी

By admin | Updated: September 6, 2014 23:39 IST

कोरपना पंचायत समितीने निविदा न काढताच वृक्षसंवर्धनासाठी कठडे खरेदी केले. आता कंत्राटदार बिलाचा तगादा लावत असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. दरम्यान ४० ग्रामपंचायतींना आवश्यकता

लखमापूर : कोरपना पंचायत समितीने निविदा न काढताच वृक्षसंवर्धनासाठी कठडे खरेदी केले. आता कंत्राटदार बिलाचा तगादा लावत असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. दरम्यान ४० ग्रामपंचायतींना आवश्यकता नसतानाही कढडे लादले आहे. यामाध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतींना ३ लाख ३० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर चौकशी करण्यात आली असून सदर प्रकरण आता आयुक्तांकडे पोहचले आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधीची खरेदी करण्यात आली असतानाही पंचायत समितीने आयुक्तांची परवानगी न घेताच मनमर्जीने कारभार केल्याचा आरोप सर्वस्तरावर आता केला जात आहे. तर ग्रामसेवकांकडे बील देवून बिल भरण्याचा तगादा अधिकारी लावत असल्याने ग्रामसेवक सध्या धास्तावले आहे. त्यामुळे येथील विस्तार अधिकाऱ्याची त्वरित बदली करून आम्हची सुटका करावी, अशी मागणी ग्रामसेवकांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे.विस्तार अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने तालुक्यातील ४० ग्रापपंचायतींना प्रती १ हजार २०० फायबर कठडे दिले. प्रती नग २७५ प्रमाणे १ हजार २०० नगाचे ३ लाख ३० हजार रकमेचे बिल पंचायत विभागातून ग्राम सेवकांना वितरीत केले. गरज नसताना जबरदस्तीने ग्रामसेवकांना यासाठी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली असून आयुक्ताकडे प्रकरण पाठविले आहे. कोरपना तालुक्यामध्ये एकूण ४७ ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी आहे. यातील ४० ग्रामपंचायतींना वृक्षसंवर्धन व रक्षणासाठी एम.आर.ई. जी.एस. योजने अंतर्गत संरक्षण कठडे पुरविण्यात आले. यासाठी निविदा देणे गरजेचे आहे. मात्र असे न करता सदर विस्तार अधिकाऱ्याने प्रती ग्रामपंचायतींना १ हजार २०० कठडे सोपविले आहे. यामध्ये विस्तार अधिकाऱ्याचे नागपूर येथील एका कंत्राटदाराशी साटेलोटे असल्याचे समजते. या प्रकारामुळे ग्रामसेवकांना वेठीस धरण्यात येत आहे. यामध्ये कंत्राटदाराचे खिसे भरले जाणार असून भुर्दंड मात्र ग्रामपंचायतींना सहन करावा लागत आहे. ही बाब उघड झाल्यानंतर आता जबरस्तीने बिल काढण्यासाठी विस्तार अधिकारी दबाव टाकत असल्याचे समजते. आहे. (वार्ताहर)