शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची उधळपट्टी रस्ते मात्र ‘जैसे थे’

By admin | Updated: December 30, 2014 23:32 IST

औद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे.

रत्नाकर चटप - नांदाफाटाऔद्योगिक तालुका म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी व डागडुजी, खड्डे बुजविणे, झुडपे तोडणे आदी कामासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांची कामे करताना दिसते. मात्र प्रत्यक्षात दोन-तीन वर्ष लोटूनही रस्त्यावरील खड्डे मात्र कायमच आहे. त्यामुळे सदर विभागाचे काम केवळ कागदावरच दिसून येत आहे.तालुक्यातील भोयगाव- कवठाळा, भोयगाव- गाडेगाव, सांगोडा- हिरापूर- आवारपूर, अंतरगाव, नारंडा, नांदाफाटा, गडचांदूर, गडचांदूर- कोरपना, गडचांदूर- देवाडा, गडचांदूर- वनोजा, गडचांदूर - राजुरा आदी मुख्य मार्गावर संबंधित विभागाअंतर्गत काम करणारे कंत्राटदार कामे करीत आहे. मात्र कामात दर्जा नसल्याची ओरड नागरिकांची आहे. काही रस्त्यांवर केवळ मुरुम टाकून रस्त्यांची डागडूजी केली आहे. रस्त्यांचे बांधकाम झाल्यानंतर संबंधित विभागाकडे देखभालीची जबाबदारी असते. यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र कामात पारदर्शकता नसल्याने प्रवाशांना खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. आजमितीला सिमेंट कंपन्यांकडे जाणाऱ्या गडचांदूर- नांदाफाटा, हिरापूर- वनोजा, कोरपना- गडचांदूर, भोयगाव- गडचांदूर मार्गाची अवस्था अधिक बिकट झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हेच खड्डे जिवघेणे ठरत आहे. आवारपूर- हिरापूर मार्गावरुन अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हिच अवस्था तालुक्यातील अन्य मार्गाची झाली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचे कामे केल्याचा कांगावा करत करीत आहे. मात्र रस्त्याकडे बघितल्यास हाच काय विकास, अशा प्रतिक्रिया आता जनमानसातून येत आहे. कोरपना - गडचांदूर मार्गावर सोनुर्ली गावाजवळ रस्त्याच्या कडा खचलेल्या आहे. यामुळे याआधी अनेक प्रवाशांचा अपघात होऊन मृत्यू झाला. आताही अधूनमधून दुचाकी वाहनांचे अपघात होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभाग कामे झाल्याचा कागदोपत्री पुरावा देत असले तरी रस्त्यांवरचे खड्डे मात्र बुजलेले नाही. एकाच मार्गावर वारंवार खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. यात काही भागातील चार- दोन खड्डे बुजवून अर्ध्यावरच कामे रखडलेले आहे. त्यामुळे कामे झाली कुठे, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.