शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगरमधील भूदान जमीन प्लॉटधारकांना मिळाली प्लॉटची आखिव पत्रिका

By admin | Updated: May 6, 2016 01:01 IST

गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक शिवाजीनगरमध्ये भुदानच्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या प्लॉटधारकांना अखेर प्लॉटची आखिव पत्रिका देण्यात आली आहे.

योजनांचा लाभ मिळणार : अनेक वर्षे नागरिकांना करावा लागला संघर्ष भद्रावती : गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक शिवाजीनगरमध्ये भुदानच्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या प्लॉटधारकांना अखेर प्लॉटची आखिव पत्रिका देण्यात आली आहे. भद्रावती शहरातील शिवाजीनगरमधील पुरग्रस्त नागरिकांना सन १९७४ मध्ये भुदानचे प्लॉट देण्यात आले होते. भुदान जमिनीचे प्लॉट वितरीत करण्यात आले होते. वरोरा तहसिलदारांच्या आदेशाप्रमाणे प्लॉट देण्यात आले. परंतु अजुनपर्यंत प्लॉटच्या जागेची आखिव पत्रिका देण्यात आली नव्हती. त्यामुळे येथील पुरग्रस्त नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत नव्हता. हे सर्व नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहत होते. येथील नागरिकांनी अनेकदा गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे जागेच्या प्लॉटची आखिव पत्रिका देण्याची मागणी केली. त्याकरिता अर्ज दिले. निवेदने दिली. परंतु शासनाने यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले व एक प्रपत्र या प्लॉटधारकांवर अन्याय करण्यात आला.येथील नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता नाना दुर्गे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी शासनाकडे धाव घेतली. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रिय मंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदन दिले. या दोन्ही मंत्र्यांकडे शिवाजीनगर येथील भुदान जमिन प्लॉट धारकांना प्लॉटची आखिव पत्रिका देण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली. दोन्ही मंत्र्यांनी निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख कार्यालय चंद्रपूर यांना पत्राद्वारे आखिव पत्रिका देण्याचे आदेश दिलेत. भूमिअभिलेखचे जिल्हा अधिक्षक जोशी, यांनी लोकप्रतिनिधींच्या पत्राची दखल घेऊन अधीक्षक थोरात यांना शिवाजीनगर येथील भुदान जमिन प्लॉटधारकांना प्लॉटची आखिव पत्रिका देण्याचे व प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले. त्या अनुषंगाने भूमिअभिलेखचे उपअधीक्षक थोरात यांनी याकडे लक्ष देऊन शासनाच्या नियमाप्रमाणे कार्यवाही केली. त्या अनुषंगाने कागदपत्राची पुर्तता करून घेतली. २ मे रोजी शिवाजीनगर येथील भुदान जमिन प्लॉटधारक ढगे व शेवंताबाई वानखेडे यांच्या प्लॉटची आखिव पत्रिका देऊन सुरूवात करण्यात आली. तसेच अन्य सर्व प्लॉटधारकांना १५ दिवसांच्या आत प्लॉटच्या आखिव पत्रिका देण्यात येईल, असे आश्वासन थोरात यांनी नानाभाऊ दुर्गे यांना दिले.आखिव पत्रिका मिळाल्याबद्दल शिवाजी नगरातील नागरिकांनी ना. सुधीर मुनगंटीवार, तसेच ना. हंसराज अहीर, जोशी जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख चंद्रपूर, थोरात उपअधिक्षक भुमी अभिलेख भद्रावती, नानाभाऊ दुर्गे, यांचे आभार मानले. शिवाजीनगरमधील प्लॉटधारकांना आखिव पत्रिका मिळावी यासाठी नानाभाऊ दुर्गे यांच्यासह प्रमोद ढगे, सचिन जयस्वाल, देवा बजारे, पाटील, दुपारे, मानकर, उपरे, बिंजवे, मनगटे, निकेश घाटे, विक्रांत बिसेन, किशोर बेलेकर आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)