शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी राजुरा येथे भिक्खू संघाचा मोर्चा

By admin | Updated: September 17, 2015 00:54 IST

चंद्रपूर येथील विहारात घुसून भिक्खू आर्यसुत्त यांच्यावर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात ...

कारवाईची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनराजुरा : चंद्रपूर येथील विहारात घुसून भिक्खू आर्यसुत्त यांच्यावर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात मंगळवारी राजुरा येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खु संघाद्वारे करण्यात आली. मंगळवारी पंचायत समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चा उईके चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक, जुना बस स्थानक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. यजावेळी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी भिक्षु शांतरक्षित महाथेरो, कृपाशरण महाथेरो, सुमन वण्णो महाथेरो, बुद्धशरण थेरो, सच्चक थेरो, अमिरूद्ध, श्रद्धानंद, चेनीय बोधी, भिक्खुनी चेतिय बोधी, मनेर खेमा आदींनी मार्गदर्शन केले. निवेदन देताना शिष्टमंडळात चरणदास नगराळे, सिद्धार्थ पथाडे, दयाराम मून, चंद्रकांत ब्राह्मणे, राजू झोडे बल्लारपूर, डॉ. उमाकांत धोटे, ऋषी वाघमारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)