शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा येथे आठ कोटींच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

By admin | Updated: September 6, 2014 01:45 IST

येथे ८ कोटी ४३ लाख ४६ हजार किमतीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

राजुरा : येथे ८ कोटी ४३ लाख ४६ हजार किमतीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री ना. संजय देवतळे यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी राजुराचे माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, नगर परिषद राजुराचे अध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनुले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, वैद्यकिय अधिक्षक डॉ. लहू कुळमेथे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा पा. लांडे, जि.प. सदस्य अविनाश जाधव, नानाजी आदे, राजुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनिल देशपांडे, नगर परिषदेचे गटनेते स्वामी येरोलवार उपस्थित होते.राजुरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे, याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करून घेतली होती. परंतु ग्रामीण रुग्णालय राजुरा जि. चंद्रपूर येथील ३० खाटावरून १०० खाटांच्या श्रेणवर्धीत उपजिल्हा रुग्णालय बांधकामाच्या ८ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी ८ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे.उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या ८ कोटी रुपयाच्या आर्थिक प्रस्तावास मान्यता दिल्याचे आरोग्य सेवा संचालनालयाचे १४ जानेवारी २०१४ रोजी निगमीत करण्यात आलेले पत्र नुकतेच २ सप्टेंबर २०१४ रोजी प्राप्त झाले असुन लवकरच राजुरा येथे या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. सदर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे खेचुन आणल्यात आमदार सुभाष धोटे यांनी शासन दरबारी पुर्ण ताकद पणाला लावली त्यामुळेच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे साकार होत आहे.राजुरा विधानसभा क्षेत्र अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असुन या क्षेत्रात एकही १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नव्हते या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मीतीमुळे संबंधीत कोरपना व जिवती तालुक्याचे रुग्णांनाही या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ मिळणार आहे. तसेच सिमेलगतच्या तेलंगाणा राज्यातील अनेक गावातील अनेक रुग्ण थेट चंद्रपूरला उपचारासाठी जात असतात त्यांनाही आता राजुरा येथे उपचार घेण्याची संधी या रुग्णालयामुळे मिळणार आहे.राजुरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे आणि या परिसरातील नागरिकांची अनेक दिवसापासून मागणी होती. त्यामुळे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग्य वेळी उपचार मिळावा, छोट्या व्याधीसाठी चंद्रपूरला जावे लागु नये, याची दखल आमदार सुभाष धोटे यांनी घेतल्याने दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)