शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

भारत निर्माण पाणीपुरवठा योजना ठरली कुचकामी

By admin | Updated: April 26, 2016 00:38 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे भीषण पाणी टंचाई सुरू आहे.

रामपूर दीक्षित येथे पाणी टंचाई : ५१ लाखांचा खर्च पाण्यात पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे भीषण पाणी टंचाई सुरू आहे. स्थानिक महिला जाम तुकुम परिसरातील लांब ठिकाणावरून पाणी आणत असून दोन महिन्यापासून पाण्यासाठी दमछाक करावी लागत आहे. या ठिकाणी भारत निर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तु बनली आहे. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित वार्ड क्र. ३ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाई सुरू आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी सन २००७ मध्ये गावकऱ्यांच्या सहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार ग्रामस्थांनी १० टक्के हिस्सा लोकवर्गणीतून जमा करण्यात आला व उर्वरीत रक्कम शासनाकडून प्रदान झाली आणि या योजनेसाठी ६५ लाख मंजूर झाल्याचे नागरिक सांगतात. या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातीलच नागरिकामधून पाणी पुरवठा समिती गठीत करण्यात आली. पाणी पुरवठा समितीकडे संपूर्ण अधिकार देण्यात आले. सुरूवातीला समितीचे अध्यक्ष म्हणून स्थानिक माजी सरपंच कु.स. घोंगडे यांनी काही दिवस राहिले. त्यानंतर याच गावातील विजय वासेकर यांची समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि तेव्हापासूनच या पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागणे सुरू झाले.अध्यक्षांचा योजनेच्या कामांवर कुठलेच अंकुश नसल्याने भारत निर्माण योजनेचे तीनतेरा वाजले आहे. यावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी मनमर्जीचा वापर करून कामासाठी खरेदी करण्यात आलेले अनेक पाईप इतरांना परस्पर विकण्यात आले. यात अध्यक्षाच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत या कामावर ५१ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यात कोणते काम झाले, याबाबत पाणी पुरवठा समिती मधील सदस्यांना सुद्धा माहिती नसल्याचे समजते. याबाबत काही ग्रामस्थांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली असून अजूनपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडूनसुद्धा कुठलीच चौकशी होत नसल्याने या प्रकरणावर संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या अध्यक्षावर कारवाईची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)