शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

भद्रावतीत आयएएस पात्रता स्पर्धा परीक्षा

By admin | Updated: July 20, 2015 00:50 IST

रशासकीय परीक्षेत महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मागील वर्षीपासून बाळासाहेब आयएएस अकादमी सुरु करण्यात आली.

१९६ विद्यार्थ्यांचा सहभाग: जिल्ह्यातील ५० टॉपर्स विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भद्रावती : प्रशासकीय परीक्षेत महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मागील वर्षीपासून बाळासाहेब आयएएस अकादमी सुरु करण्यात आली. या अकादमीतर्फे आयएएस पात्रता स्पर्धा परीक्षेचे आयोजन स्थानिक कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे १९ जुलैला करण्यात आले. यामध्ये एकूण २२८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले तर १९६ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले.या स्पर्धा परीक्षेचा निकाल २७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर होणार आहे. या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील ५० टॉपर्स विद्यार्थ्यांची आॅनलाईन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गाला मुंबईच्या तज्ज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभणार आहे. आॅनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था आ. बाळू धानोरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या कालावधी एक वर्षाचा आहे. भद्रावती येथील आयएएस पात्रता स्पर्धा परीक्षा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली. न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, प्राचार्य दोहतरे, प्रा. संजय आसेकर, कविश्वर शेंडे, शरद राजुरकर, अजय विधाते, बंडू दरेकर, विश्वास शेंडे, शरद राजुरकर, रुपेश ढवस, दादाजी राऊत, विनोद वानखेडे, विवेक आकोजवार, प्रमोद गेडाम, नितीन कवासे, संदीप वडाळकरे यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)