शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST

२१व्या शतकात प्रत्येकाकडे ॲण्ड्रॉइड मोबाइल आला आहे. त्यामुळे सर्वजण मोबाइलमधील सर्व ॲप्लिकेशनचा सर्रास वापर करतात. मोबाइलवर सोशल नेटवर्किंग साइट ...

२१व्या शतकात प्रत्येकाकडे ॲण्ड्रॉइड मोबाइल आला आहे. त्यामुळे सर्वजण मोबाइलमधील सर्व ॲप्लिकेशनचा सर्रास वापर करतात. मोबाइलवर सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासह फोन पे, गुगल पे आदी ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ऑनलाइनमुळे जगातील प्रत्येक माहिती क्षणात एका क्लिकवर मिळत आहे. ॲप डाऊनलोड करताना सुरक्षाही बाळगली जात असली तरी फसवणूक होण्याचा धोकाही वाढला आहे. यापूर्वी अनेकांच्या बॅंक खात्यातून रक्कम पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. ओटीपी क्रमांक मागवून फसविण्याचे प्रकारही समोर आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सन २०२१ मध्ये --- तर २०२१ मध्ये --- असे दीड वर्षात -- तक्रारी आल्या आहेत. आत तर फेसबुकच्या माध्यमातून पैसे उकायण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अशी मागणी झाल्यास तात्काळ फेक अकाउण्ट शोधून ते डिलीट करावे, अथवा स्थानिक पोलीस ठाणे किंवा सायबर सेल कक्षाशी संपर्क साधावा.

बॉक्स

पोलीस अधीक्षकांचीच बनवली होती बनावट आयडी

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांचीच फेसबुकवर बनावट आयडी बनवून क्राइम करणाऱ्यांना सायबर पोलिसांना मोठे चॅलेंज दिले होते. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली होती. असे अनेक प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

बॉक्स

परिचयातील व्यक्तीच्या नावाचाच वापर

१) एखाद्याची फेक फेसबुक प्रोफाइल बनवून त्यांच्या मित्र-मैत्रीण, नातेवाइकांना आजार व इतर कारणे सांगून पैसे मागितले जात आहेत.

२) विशेष म्हणजे ज्यांच्या नावाने बनावट अकाउण्ट बनविले आहे, त्याला याची कल्पनाही नसते. मित्राने कल्पना दिल्यानंतर हा प्रकार समोर येतो.

३) परिचित व्यक्तीच्या नावाचा वापर करीत फेसबुकवरून पैसे मागण्याचे प्रकार वाढत आहेत.

बॉक्स

..अशी घ्या काळजी

ज्या मित्रांना त्या प्रोफाइलवरून रिक्वेस्ट गेली त्यांच्याकडून सदर फेक प्रोफाइलची फेसबुक लिंक (यूआरएल) मागवून घ्या. त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाइलवर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट (.) वर क्लिक करा, तुमच्या नावासमोर फर्स्ट सपोर्ट किंवा रिपोर्ट प्रोफाइल हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर प्रिंटिंडिग टू बी समवन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तीन ऑप्शनपैकी मी, अ फ्रेंड आणि सेलिब्रिटी ही ऑप्शन दिसतील. आपलीच बनवलेली फेक प्रोफाइल रिपोर्ट करत असल्या अ फ्रेंड हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर नेक्स्ट करा. थोड्यावेळाने फेक प्रोफाइल अकाउण्ट बंद होईल.

---

कोट

जर आपल्या मित्राची दुसऱ्यांदा फ्रेण्ड रिक्वेस्ट येत असेल तर त्याला कॉल करून विचारानंतरच ती एक्सेप्ट करा. आपले प्रोफाइल लॉक करून ठेवा. बनावट आयडीवरून मॅसेज आल्यास लगेच स्थानिक पोलिसांशी किंवा सायबर पोलिसांशी संपर्क करा.

-निशिकांत रामटेके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सायबर क्राइम, चंद्रपूर