शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात उत्तम बॉटनिकल गार्डन होणार

By admin | Updated: May 9, 2016 00:59 IST

विसापूर येथे तयार करण्यात येणारे बॉटनिकल गार्डन हे देशातील सर्वात उत्तम गार्डन होणार असून वनस्पती शास्त्राचा...

सुधीर मुनगंटीवार : विसापुरातील बंगळुरुच्या धर्तीवर तयार होणाऱ्या बॉटनिकल गार्डनच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजनबल्लारपूर : विसापूर येथे तयार करण्यात येणारे बॉटनिकल गार्डन हे देशातील सर्वात उत्तम गार्डन होणार असून वनस्पती शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी विसापूर गार्डन खुले विद्यापीठ असेल, असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.बल्लारपूर मार्गावर असलेल्या विसापूर येथे बंगळुरुच्या धर्तीवर निर्माण करण्यात येणाऱ्या बॉटनिकल गार्डनच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.वनविकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्य वनसंरक्षक तथा सामाजिक वनीकरणचे उपमहासंचालक महीप गुप्ता, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, सामाजिक वनीकरण उपसंचालक डी.आर. काळे व कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सात कोटी रुपये खर्च करून ही संरक्षण भिंत बांधण्यात येत असून २५० हेक्टरवर बॉटनिकल गार्डन निर्माण करण्यात येणार असल्याचे यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. उत्तमातील उत्तम गार्डन तयार करण्यात येणार असून यामुळे विसापूर येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होणार आहे. बॉटनिकल गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतील, असेसी ते म्हणाले. तीन वर्षांत उद्यान पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. २५० कोटी रुपये खर्च करून विसापूरजवळ सैनिकी शाळा उभारण्यात येणार असून सैनिकी शाळेमुळे विसापुरची अर्थव्यवस्था बदलणार आहे. विसापूरला आपण विविध विकास कामे केली असून येथील चित्र बदलणार असल्याचे ते म्हणाले.१९९५ पासून विसापूरची जनता आपल्या पाठीशी उभी राहिली. म्हणून विसापुरचा विकास करणे माझे कर्तव्य आहे. रस्त्यांसाठी २० लाख रुपये मंजूर केले. स्मशानभूमी रस्ताही मंजूर करण्यात आला आहे. बल्लारपूर येथील रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी रेल्वे मंत्र्यांना आपण विनंती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. निवेदनात नमूद केलेली सर्व विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. वनस्पती उद्यानामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विकासाचा आराखडा तयार करत आहोत. येथील शेतकऱ्यांच्या शेतात विहीर खोदण्याची योजना राबविली जाईल. आरोग्य केंद्र यापेक्षाही उत्तम करणार व सर्व साहित्य देणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.प्राथमिक आरोग्य केंद्र्र व प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा विसापूर येथे ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर विसापुरातील शिवाजी चौकात सभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, आदी यावेळी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)