शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

विद्यार्थी घडविण्यासाठी टेक्नोसॅव्ही व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:27 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक बालकाला शाळेत दाखल झाले पाहिजे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी तंत्रज्ञानाकडे कदापि दुर्लक्ष करून नये. हे तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करून टेक्नोसॅव्ही झाले तर आदर्श विद्यार्थी घडतील, असे प्रतिपादन प्राचार्य धनंजय चापले यांनी केले.

ठळक मुद्देधनंजय चापले : जिल्हा शैक्षणिक विकास संस्थेत प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक बालकाला शाळेत दाखल झाले पाहिजे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी तंत्रज्ञानाकडे कदापि दुर्लक्ष करून नये. हे तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करून टेक्नोसॅव्ही झाले तर आदर्श विद्यार्थी घडतील, असे प्रतिपादन प्राचार्य धनंजय चापले यांनी केले. जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्था, बाबूपेठ येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात ते बोलत होते.शिक्षणाधिकारी (निरंतर) निलेश पाटील यांनी उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, प्रा. गंगाधर वाळले, जगन्नाथ कापसे, प्रल्हाद खुणे, संजयकुमार मेश्राम, आयटी विभाग प्रमुख विनोद लवांडटे, विवेक इत्तडवार, धनराज येलमुलवार आदी उपस्थित होते. प्राचार्य चापले म्हणाले, शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. या बदलांमध्ये स्पर्धाक्षम विद्यार्थी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे नव्या युगाशी संवाद साधणारी ज्ञानसंपदा व तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठीच हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डोर्लीकर म्हणाले, आजच्या शिक्षण पद्धतीत केवळ पुस्तकांचा वापर करून उपयुक्त ठरणार नाही. संगणकाच्या माध्यमातून जगभरातील ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी आता अद्ययावत राहिले पाहिजे.टेक्नो हा उपक्रम प्रत्येक आठवड्यात शनिवारी घेतला जातो. तंत्रज्ञानाचा एक विषय घेऊन उपस्थित प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले जाते. यासाठी इच्छुक शिक्षकांना गुगुल लिंक आणि प्रशिक्षणाची महिती एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. उपक्रमात पाच हजार शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ठ पुढे ठेवण्यात आले. टेक्नो कार्यशाळेत १५० शिक्षक सुट्टीच्या वेळात उपस्थित होते. माहितीच्या सादरीकरणासाठी शैक्षणिक साहित्य तसेच ज्ञानपूरक साहित्य निर्मितीसाठी पीपीटीद्वारे केले जात आहे. यासाठी जिल्हा आयटी सेलचे सदस्य निखील तांबोळी, गिरीधर पानघाटे, विठ्ठल आवंडे, वंदना वनकर, अर्चना जिरकुंटवार, यशवंत महल्ले, संगीता सराफ, नीता चहांदे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.सहभागी शिक्षकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रास्ताविक प्रा. विनोद लवांडे तर संचालन अल्का ठाकरे यांनी केले. धनराज येलमुलवार यांनी आभार मानले. यावेळी संजय माथनकर, रवी तामगाडगे, उद्धव राठोड, कल्पना बन्सोड, कृतीक बुरघाटे उपस्थित होते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानEducationशिक्षण