शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

बा पावसा का रुसलास ? : धरणीमातेला हिरवा शालू कसा नेसवणार!

By admin | Updated: July 16, 2015 01:17 IST

जुलै महिन्यात सर्वत्र पावसाचे थैमान असते. पेरणीची कामे संपल्यानंतर काळ्या मातीवर हिरवीगार पिके डोलताना दिसतात.

बळीराजाचे डोळे आभाळाकडे !चंद्रपूर : जुलै महिन्यात सर्वत्र पावसाचे थैमान असते. पेरणीची कामे संपल्यानंतर काळ्या मातीवर हिरवीगार पिके डोलताना दिसतात. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्व पेरण्या कडाक्याच्या उन्हामुळे करपू लागल्या आहेत. बळीराजाचे अश्रूभरले डोळे एकटक आभाळाकडे लागले आहे.आधीच शेतकरी महागाई, कर्ज यामुळे खचून गेला आहे. यंदा तरी निसर्ग साथ देईल अशा आशेत शेतकऱ्यांनी प्रारंभी तीन दिवस पाऊस पडल्यानंतर मोठ्या जोमात पेरण्या आटोपल्या. मात्र शेतकऱ्यांना नेहमीच दगा देणाऱ्या पावसाने यावेळीदेखील दगाच दिला आहे. अलिकडच्या काळात शेतकऱ्यांना खडतर दिवस पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाच्या सरीने रुजलेल्या बियांना चांगलेच अंकूर फुटले. मात्र मातीतून उगविलेल्या रोपाची अर्धा फूट उंचीही वाढली नाही आणि पावसाने दडी मारली. मागील २० दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नाही. ढगाळ वातावरण व आभाळात कडकडाट होतो. मात्र पाऊस पडत नाही. आज पाऊस पडेल, उद्या पडेल, या आशेवर शेतकरी एक एक दिवस चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहे. दररोज देवदेवतांना साकडे घालत आहे. मात्र देवदेवतांसह निसर्गही शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ७० टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यातील १५ टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा असतील. उर्वरित शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहेत. मात्र निसर्ग दगा देत असल्याने या शेतकऱ्यांच्या पेरण्या करपत चालल्या आहेत. डोळ्यादेखत पेरण्या मातीमोल होत असतानाही शेतकऱ्यांना काहीही करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी जूनमध्ये तीन दिवस आलेल्या पावसानंतरही पेरण्या केल्या नाही. आणखी पाऊस पडेल तेव्हा पेरण्या करू, अशा मानसिकतेत हे शेतकरी होते. मात्र त्यानंतर पाऊस पडलाच नाही. त्यामुळे जुलै महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाही. आणखी आठवडाभर पाऊस आला नाही तर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहे. त्यानंतरही पाऊस पडला नाही तर यंदा दुष्काळ निश्चित मानला जात आहे. (शहर प्रतिनिधी)पहाडावरील पिके करपलीमाणिकगड पहाडावर सिंचनाच्या सुविधा नाही. पावसाचे पाणीच शेतकऱ्यांचा आधार आहे. येथील शेतकरी खरीप हंगामावरच अवलंबून आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूल, उडीद या पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी जूनमध्येच केली. मात्र पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके करपून जात आहे. येथील शेतकरी गरीब आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणांची खरेदी कुठून करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कृषी विभागाचे अद्याप सर्वेक्षण नाहीमागील २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके सुकत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष नाही. कृषी विभागाने तर या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही यंत्रणेने अद्याप दाखविले नाही.उन्हाची काहिलीही वाढलीजुलै महिना म्हणजे पावसाचा महिना. या महिन्यात खरंतर अनेक ठिकाणी नदीनाले भरून पूरपरिस्थिती निर्माण होते. मात्र यावेळी या महिन्यात पावसाचा थेंबही नाही. उलट उन्हाची काहिली वाढून नागरिकांना उन्हाळ्यासारखे जाणवू लागले आहे. काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू झाले आहे.