शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

बॅरिस्टर खोब्रागडे म्हणजे कोळशातील हिरा !

By admin | Updated: September 27, 2015 00:47 IST

कोळशाच्या खाणीत हिरे सापडतात, असे आपण ऐकले होते, मात्र कधी बघितले नाही. पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे कर्तृत्व बघता हे वाक्य तंतोतंत लागू होते.

सुधीर मुनगंटीवार : बॅरि. खोब्रागडेंच्या स्मृतिदिनी गौरवोद्गारचंद्रपूर : कोळशाच्या खाणीत हिरे सापडतात, असे आपण ऐकले होते, मात्र कधी बघितले नाही. पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे कर्तृत्व बघता हे वाक्य तंतोतंत लागू होते. ते खऱ्या अर्थाने हिरा होते. चंद्रपूरचे नाव देशाच्या नकाशावर आणण्याचे काम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कर्तृत्वामुळे शक्य झाले, असे गौरवोदगार राज्याचे वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.शुक्रवारी २५ सप्टेंबरला सायंकाळी स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचा ९० वा जयंती समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, ज्येष्ठ पत्रकार रामदास रायपुरे, डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेश मून, महावितरणच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार आदी प्रमुख पाहुणे होते. यावेळी बोलतांना मुनगंटीवार म्हणाले, राजाभाऊंनी भूमिहिनांसाठी केलेली आंदोलने, दारूबंदीसाठी केलेला संघर्ष सर्वसामान्यांसाठी आदर्शवत ठरला आहे. या संघटन कुशल नेत्याने चंद्रपूरहून राजधानी दिल्लीत राज्यसभेचा उपसभापती म्हणून मारलेली धडक कर्मवीर मा.सा. कन्नमवारांनंतर जिल्ह्यात कोणालाही शक्य झाली नाही. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून त्यांनी समाजात समता, ममता, बंधुत्व निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. भाजपा सरकारने मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा देश घडविण्यासाठी आम्हाला मिळणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने हे वर्ष समता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन येथील डॉ. बाबासाहेबांच्या निवासस्थानी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन राज्यात सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार श्यामकुळे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)