शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन रखडल्याने बरांजला धोका

By admin | Updated: August 3, 2014 23:16 IST

भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे बरांज (मोकासा) या गाव संकटात सापडले आहे. या गावाची लोकसंख्या १६०० ते १७०० एवढी आहे. गावाच्या सभोवताल खाणीचा

प्रशासन गंभीर नाही : संपूर्ण गावच नष्ट होण्याची भीतीविनायक येसेकर - भद्रावतीभद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे बरांज (मोकासा) या गाव संकटात सापडले आहे. या गावाची लोकसंख्या १६०० ते १७०० एवढी आहे. गावाच्या सभोवताल खाणीचा परिसर व मातीचे ढिगारे असल्याने दरवर्षी या गावाला पुराचा वेढा असतो. अतिवृष्टी झाली तर हे संपूर्ण गाव नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे या गावाचे तात्काळ पुनर्वसन करा, अशी मागणी आहे. मात्र अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असल्याने बरांजवरील जीवघेणा धोका कायम आहे. बरांज (मोकासा) येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून गावाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे निवेदन देत आहेत. यासाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासन त्यांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. या गावाला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा गावकरी किती धोक्यात जीव जगत आहे, हे दिसून आले. एम्टा या कोळसा खाणीच्या दुसऱ्या फेसचे जोरात काम चालू आहे. पहिल्या फेसच्या मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याने या गावाला आधीच वेढले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण गावच पाण्याने वेढले होते. त्यावेळी प्रशासनाने त्यांना बाहेर काढण्याकरिता स्वयंचलीत बोटीचा वापर केला होता. यावर्षी दुसऱ्या फेसचे उत्खनन सुरू झाले असून खाणीतून निघणाऱ्या मातीचा गावाला लागूनच दुसऱ्या भागाने डोंगर उभा केला जात आहे. हे उत्खनन गावातील एक रस्ता सोडता चारही बाजूने सुरु आहे. याठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व नवीन वस्ती खाणीच्या अगदी काठावर आल्याने भविष्यात खाणीची दरड कोसळल्यास अख्खे गावच खाणीत कोसळून मोठी प्राणहानी व वित्तहानी होऊ शकते. गावाच्या इतर भागाकडे उंच मातीचे ढिगारे असल्याने तेसुद्धा अती पावसाने गावावर कोसळून गाव ढिगाऱ्याखाली गाडले जाऊ शकते, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. अविवृष्टी झाली तर पुराचा जोर वाढून गाव बुडण्याची शक्यताही आहे. खुद्द गावकऱ्यांनीच ही भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. मात्र काहीही उपयोग झाला नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या गावाचे सुरक्षित जागी पुनर्वसन करावे, अशी आर्त मागणी गावकरी करीत आहेत. या संदर्भात कर्नाटका एम्टामधील एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मातीच्या ढिगाऱ्यांच्या बाजुने कंपनीने मोठे नाले केले असल्याचे सांगितले.