शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

बंदर शिवापुरात होत आहे महिलांच्या अंंतरवस्त्रांची चोरी

By admin | Updated: September 21, 2015 01:11 IST

चिमूर तालुक्यातील राज्य महामार्गावर असलेल्या बंदर शिवापूर गावात मागील दीड महिन्यापासून महिलांच्या अंतरवस्त्राची चोरी होत आहे.

दीड महिन्यापासून सुरू आहे प्रकार : महिलांसह गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण

निराजकुमार चुनारकर  खडसंगी चिमूर तालुक्यातील राज्य महामार्गावर असलेल्या बंदर शिवापूर गावात मागील दीड महिन्यापासून महिलांच्या अंतरवस्त्राची चोरी होत आहे. चोरी गेलेले वस्त्र गावातील मंदिराच्या किंवा शाळेच्या परिसरात ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे गावात शंका कुशंकाना पेव फुटले आहे. सुरू असलेल्या या प्रकारामुळे हे गाव सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकारामुळे महिलांसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कुण्यातरी अज्ञाताकडून गावात केवळ भय निर्माण करण्यासाठी असे कृत्य केले जात असल्याचा अंदाज गावातील सुशिक्षितांकडून बांधला जात असला तरी वयोवृद्ध व विशेषत: महिलांना हा जादूटोण्याचा प्रकार वाटत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या बंदर (शिवापूर) गावात सुशिक्षितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सुशिक्षित युवक या घटनेमुळे गावातील युवक अंधश्रद्धेच्या दृष्टीने या प्रकाराकडे बघत नसले तरी गावातील वयोवृद्ध मात्र या प्रकाराला भानामतीचा प्रकार मानत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये अकारण भितीचे वातावरण पसरत आहे. असे असले तरी गावातील युवक मात्र नागरिकांचे स्वयंस्फुर्तीने समुपदेशन करित आहेत.गेल्या दिड महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. चोरी केलेले अंतरवस्त्र गावातील हनुमान मंदिर किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात अंथरलेल्या दुपट्टयावर ठेवले जात आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरूवातीला गावकऱ्यांनी ेयाकडे कानाडोळा केला. मात्र अलिकडे दोनदिवसा आड या घटना घडत असल्याने नागरिकांनी या प्रकाराची दखल घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्याची माहिती दिली. यादरम्यान, काहींनी हा प्रकार बंद करण्यासाठी बुवाबाजी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र युवकांनी प्रतिसाद न देता सरळ अंधश्रद्धा निर्मुलन समिती व चिमूर पोलिसांना या घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली. महिलांचे अंतरवस्त्र चोरी जाण्याचा प्रकार हा भानामती, किंवा जादूटोण्याचा नसून हे खोडसाळ प्रवृत्ती किंवा विकृत मानसिकतेतून करण्यात येत आहे. याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून नागरिकाने बघावे व कसल्याही प्रकारची भीती बाळगून नये तथा युवकानी याबाबत जनजागृती करावी.- हरिभाऊ पाथोडे, विदर्भ संघटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर