शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

राष्ट्रसंतांचा अवमान करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला

By admin | Updated: August 26, 2016 00:58 IST

श्रीगुरुदेव सेवा मंडळाने तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर टीका करणाऱ्या

तहसीलदारांना निवेदन : ग्रामगीतेचा अपमान केल्याचा आरोपकोरपना : श्रीगुरुदेव सेवा मंडळाने तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर टीका करणाऱ्या निवृत्त वक्ते यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इ.स. १९५५ मध्ये जमान येथे झालेल्या विश्वश्रम परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. राष्ट्रसंतांच्या अलौकिक ज्ञानामुळे व व्यक्तिमत्वामुळे १८ राष्ट्राच्या सल्लागारपदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची निवड केली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे अखील भारतीय साधु समाजाचे संस्थापक अध्यक्ष होते. विश्वहिंदू परिषदेचे प्रमुख म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व प्रधानमंत्री पंडीत नेहरू यांच्यापासून जगभरातील सेवा व धर्म देशभक्ती लोकजागृतीचे कार्य केले. स्वातंत्र्य भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘राष्ट्रसंत’ ही पदवी बहाल करून महाराजांचा गौरव केला. त्याच राष्ट्रसंतांनी ‘ग्रामगीता’ या ग्रंथाचे लिखान केले. हे सर्वमान्य व सर्वज्ञान असताना पंढरपूर येथील ह.भ.प. निवृत्ती वक्ते यांनी ‘सवेद वैकुंठ गमन’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यातून त्यांनी तुकाराम महाराजाचा अपमान अप्रत्यक्ष केला. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर आक्षेपार्ह लिखान केले. त्यांचा व आद्यग्रंथ ग्रामगीता या ग्रंथाचा ह.भ.प. निवृत्ती वक्तेनी हेतुपुरस्पर अपमान केला. ह.भ.प. वक्तेनी तुकडोजी महानास्तिक होते. तेच ग्रामगीता ग्रंथाना संडास साफ करणारी गीता, असे लिखान करून अतिशय खालच्या दर्जाची शब्दरचना पुस्तकात लिहून अपमान केला, असा आरोप केला आहे.ह.भ.प. वक्तेनी केलेले लिखान समाजात दुही निर्माण करणारे आहे. हे काम वक्तेनी जाणीवपूर्वक केले आहे. महाराष्ट्र व केंद्र शासन राष्ट्रसंताचा गौरव करीत असताना ह.भ.प. निवृत्ती वक्तेचा उपदव्याप राष्ट्रसंतांची प्रतिमा मलीन करणारा आहे. त्यामुळे निवृत्ती वक्ते यांचा जाहीर निषेध तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कोरपना तालुक्यातील गुरुदेव भक्तांनी केली.तहसीलदार कोरपना पुष्पलता कुमरे यांना गुरुदेव भक्तांसह देण्यात आले. तहसीलदारांना निवेदन सादर करताना गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रचारक महेंद्र चौधरी, डॉ. ठाकरे, विठ्ठलराव डाखरे, महादेव माडवकर, मिनाथ पेटकर, मनोज गोरे, रामदास गारघाटे, बापुजी पिपळकर, हुशेन किन्नाके, सातपुते, प्रकाश डाहुले, पुष्पा नवले, शोभाबाई दोरखडे, बंडू राजुरकर, रमेश घुमे, महादेव डुलके, मधुकर चौधरी, अर्जुन वल्के आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)