शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात रेल्वे रुळावरून मालगाडीचे डब्बे घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:13 IST

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधून प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंटनी भरलेली मालगाडी सोमवारी संध्याकाळी गोल पुलाजवळ उतरल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधून प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंटनी भरलेली मालगाडी सोमवारी संध्याकाळी गोल पुलाजवळ उतरल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तब्बल ५ तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे ( रेल्वे वॅगन ) रुळावर घेतले. रात्री ११ वाजता तेलंगाणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला.

            ही मालगाडी अंबुजा सिमेंट भरून बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जाण्यास सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निघाली होती, परंतु जवळच असलेल्या गोल पुलाजवळील पॉइंटवर ३ डब्बे  रुळावरून घसरले. घटनेची माहिती इंजिनिअरिंग विभागाने तात्काळ नागपूर डीआरएम मुख्यालयास कळवली नागपूर येथील रेल्वे विभागाचे सहायक डीआरएम सतपती, स्टेशन मास्टर रामलालसिंग, येथील विभागीय हायक इंजिनिअर एन.ए.नागदेवे यांच्या देखरेखी खाली वर्धेवरून आलेल्या क्रेनच्या मदतीने रेल्वे गँगमेन यांनी रेल्वे वॅगन बाजूला करण्यात यश मिळविले व डब्बे यार्डमध्ये उभे करण्यात आले आहे. घटना स्थळाची पाहणी येथील रेल्वे डीआरयूसीसी चे सदस्य जयकरणसिंग बजगोती यांनीही केली. 

   घटनेच्या वेळी पाऊस सुरु होता. ही घटना नेमकी गोल पुलावर घडली. डब्बे खाली पडले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण गोलपुलाखालील रस्ता हा जाण्यायेणाऱ्यांचा वर्दळीचा असतो. कोरोना संकटामुळे सध्या बल्लारशाह स्थानकावर दिल्ली व आंध्रप्रदेश कडून येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे ट्राफिक जाम होण्याची पाळी आली नाही  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे