शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

बाळापूर-तळोधी मार्ग ठरतोयं मृत्युपथ

By admin | Updated: September 19, 2015 01:35 IST

तळोधी - आरमोरी - गडचिरोली हा परिसरातील सर्वात कमी अंतराचा मार्ग असल्यामुळे या मार्गावर नियमीत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

तळोधी (बा) : तळोधी - आरमोरी - गडचिरोली हा परिसरातील सर्वात कमी अंतराचा मार्ग असल्यामुळे या मार्गावर नियमीत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र तळोधी-बाळापूर दरम्यान या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे व डाबंरी रस्त्याच्या कडेला एक दिड फुट खोलीचा भाग निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात दररोज एक ना एक अपघात घडत आहे. त्यामुळेच तळोधी- बाळापूर मार्ग हा मृत्युपथ ठरणार तर नाही ना, असा प्रश्न या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तळोधी-बाळापूर या मार्गावर श्रीक्षेत्र गायमुख देवस्थान व रेल्वे स्थानक ही दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत. तसेच बाळापूरच्या पुढे मेंडकी, गांगलवाडी, आरमोरी व गडचिरोली ही मोठी ठिकाणे असून या मार्गावर नियमीत दुचाकी, चारचाकी खासगी वाहने तसेच महामंडळाच्या बसेस धावतात. परंतु रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे व डांबरी रस्त्याच्या कडेला एक-दीड फूट खोलीची दरी यामुळे येथे वाहन चालकाला डोळ्यात तेल घालून वाहन चालवावे लागते. थोडी जरी नजरचूक झाली तर वाहनाला अपघात ठरलेला आहे. त्यामुळे या मार्गावर नियमित दुचाकी घसरून पडणे, दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती रस्त्यावर पडले, चार चाकी वाहन रस्त्याच्या खाली घसरणे यासारखे अपघात हे नियमित सुरू असतात व अशा प्रकारच्या अपघातात अनेक व्यक्ती जबर जखमीसुद्धा झाल्या आहेत.यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. परंतु परिसरातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्याकडे कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. (वार्ताहर)