शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ ६२ स्वयंपाकिणींच्या प्रश्नावर १५ दिवसात निर्णय घेणार

By admin | Updated: July 23, 2015 00:44 IST

जिल्ह्यातील ३६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या ६२ स्वयंपाकिनी आणि मदतनिसांना कामावरून ...

सीईओंच्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता : आठवडाभरापासून सुरू होते आंदोलनचंद्रपूर : जिल्ह्यातील ३६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या ६२ स्वयंपाकिनी आणि मदतनिसांना कामावरून काढल्याप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेले उपोषण बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आले. येत्या १५ दिवसात या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावरच आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.मागील १३ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर या ६२ बडतर्फ स्वयंपाकीनी आणि मदतनिसांचे आमरण उपोषण सुरु होते. मागील सत्रात कामावरून कमी केलेल्या या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यासाठी विविध पंचायत समिती स्तरावर आंदोलने सुरु होती. दरम्यानच्या काळात तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांची बैठक बोलाविली होती. त्यात १० जुलै २०१४ च्या शासकीय परिपत्रकाचा आधार घेऊन संबंधितांना कामावर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांना कामावर घेण्यात न आल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी १३ जुलैपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण आरंभले होते. या काळात चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयातही दाखल करण्यात आले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत होता. दरम्यान, २० जुलैला शिक्षणाधिकारी देशपांडे यांना उपोषण मंडपात पाठवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला. मात्र तो विफल ठरला. बुधवारी परिस्थिती अधिकच चिघळून आंदोलनकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर येवून घोषणाबाजी सुरू केली. जेलभरो आंदोलनही पुकारले. परिस्थिती लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांनी शिष्टमंडळास आपल्या कक्षात चर्चस बोलावून बाजू ऐकून घेतली. येत्या पंधरा दिवसात यावर निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र लेखी आश्वासनाशिवाय हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. अखेर लेखी आश्वासन मिळाल्यावर लिंबूपाणी घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)