शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका माघारल्या

By admin | Updated: July 29, 2015 00:45 IST

खरिप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने सर्व बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

लोकमत विशेषचंद्रपूर : खरिप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने सर्व बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. मात्र कर्जासाठी शेतकऱ्यांवर विविध अटी लादून कर्ज देण्यास दिरंगाईचे धोरण बँकांनी अवलंबल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत कर्ज वाटप उद्दीष्टपुर्तीच्या केवळ ६७ टक्के कर्ज वाटप व्यावसायिक व राष्ट्रीयकृत बँकाद्वारे झाले असून अद्यापही ३२ टक्के कर्ज वाटप शिल्लक असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालातून मिळाली आहे. कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकावर कारवाई करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. कोणताही शेतकरी आर्थिक अडचणीत राहू नये, त्याच्यावर जुने कर्ज थकीत असेल तरी नवीन कर्ज उपल्बध करून द्यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला राष्ट्रीयकृत व व्यावसायिक बँकांनी बगल दिल्याचे दिसून येत आहे.खरिप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यातील ८१ हजार ८९१ शेतकऱ्यांना ६२३ कोटी २० लाख रूपयाचे तर रबी हंगामासाठी ६५ कोटी ६५ लाख रूपये कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. यात खरिप हंगामासाठी १७ जुलैपर्यंत ५४१ कोटी ५७ लाख रूपयाचे कर्ज वाटप झाले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला खरिपासाठी ३८३ कोटी रूपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. या बँकेने १०० टक्के कर्ज वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकाना १८० कोटी ७० लाख रूपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. मात्र यापैकी १८ हजार २४२ शेतकऱ्यांना केवळ १२३ कोटी २५ लाखाचे कर्ज वाटप केले आहे. या कर्ज वाटपाची टक्केवारी ६८ टक्के आहे. तसेच व्यावसायिक बँकांना १८ हजार ५८३ शेतकऱ्यांना १९३ कोटी २० लाख रूपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. या बँकांनी सुद्धा १७ जुलैपर्यंत १२८ कोटी ५७ लाख रूपयाचे कर्ज वाटप केले आहे. याची टक्केवारी ६७ इतकी आहे. खरिप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकरी कामात व्यस्त आहेत. खत, बियाणे खरेदी करावे लागत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर न झाल्याने अडचणी येत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)पावसाच्या हुलकावणीने  चिंता वाढलीयावर्षी पाऊस सतत हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांत चिंता पसरली आहे. गतवर्षीचे कर्ज थकीत असताना नवे कर्ज घेऊन शेती करण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. मात्र यावर्षीही हमखास उत्पन्न होईल याची आशा नाही. त्यामुळे यावर्षी घेतलेले कर्ज आणि जुने थकीत कर्ज कसे फेडणार ही चिंता अनेक शेतकऱ्यांना लागली आहे. विविध दाखल्यांसाठी दमछाकराष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्याला कर्जासाठी विविध दाखल्यांच्या अटी ठेवल्या असून हे दाखले मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ना हरकत प्रमाणपत्र, कर्ज नसल्याचा दाखला, हिस्सेदारांचे सहमती पत्र असे अनेक दाखले कर्ज प्रकणाला जोडावी लागत आहेत. हे दाखले लवकर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची पायपीट होऊन आर्थिक व मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. उसणेवारी, उधारीवर खताची खरेदीकर्जासाठी प्रकरण सादर करूनही कर्ज मिळण्यास दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मात्र पिकाला खताची आता आवश्यकता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी नातेवाईकाकडून उसणेवारी पैसे मागून, उधारीवर खत खरेदी करत असल्याचे ग्रामीण भागातील शेतकरी सांगतात. कर्ज प्रकरणे निकाली काढण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.