शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रमातून रविवारी बाबूजींना आदरांजली

By admin | Updated: June 29, 2017 01:35 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त

 लोकमत-आयएमएचा उपक्रम : डॉक्टर्स डे अंतर्गत सामूहिक आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. २ जुलैला चंद्रपुरात रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत जिल्हा कार्यालय आणि इंंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थाही सहभागी होत आहेत. २ जुलैला सकाळी ८ वाजता बायपास मार्गावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर व प्लास्टिक रिसायकलिंग फॅक्टरी परिसरात वृक्षारोपणाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यानंतर स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाजवळील आयएमए सभागृहात सकाळी १० वाजता या रक्तदान शिबिराला सुरूवात होणार आहे. स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पाजंली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. या शिबिरासाठी वेळेवरही उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्याची गरज नाही. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतिनिमित्त देशभरात १ जुलै हा डॉक्टर डे म्हणून पाळला जातो. तर, १ जुलै ते ७ जुलै हा ‘डॉक्टर्स वीक’ म्हणून पाळला जातो. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयएमएच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सामाजिक उपक्रम व्हावा, यासाठी आयएमएचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था या महारक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरसावल्या आहेत. या शिबिरामध्ये रक्तदान करून रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय करमरकर, सचिव डॉ. मनीष मुंदडा, आणि चंद्रपूर लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अमोल कडुकर ९२७०१३१५८०, पूजा ठाकरे ९०११३२२६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा. रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र व प्रथमोपचार किट इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. या सोबतच प्रमाणपत्र देऊन गौरवित केले जाणार आहे. तसेच रक्तदात्यांना प्रथमोपचार किट दिली जाणार आहे. लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहन बाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टचे सर्व सदस्य, वृत्तपत्र विक्रेतेबंधंूसह महाविद्यालयीन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.