शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती केली

By admin | Updated: April 16, 2016 00:43 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला. उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी संघर्ष केला.

हरीश गेडाम : ग्रामस्वराज्य अभियानाला प्रारंभबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला. उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी संघर्ष केला. त्यांच्या लढ्यामुळे समाजाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या अतुलनिय कार्याने देश एकसंघ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीने समाज परिवर्तन होत आहे, असे मत बल्लारपूर पंचायतीचे माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सभागृहात ग्राम उदय ते भारत उदय अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. सदर अभियान १४ ते २४ एप्रिल दरम्यान तालुक्यातील १७ ग्रामपंचायत स्तरावर राबविले जाणार आहे. अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. गेडाम बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे, गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू, पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मी कुमरे, सुशील गुंडावार, सुधाकर खांडरे, सुनील नुतलवार, सरिता उरकुडे, प्रदीप ताडुरवार, अभियंता श्रीवास्तव यांची उपस्थिती होती. दरम्यान, उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना राष्ट्रीय समरसता दिनाप्रीत्यर्थ शपथ दिली.बीडीओ गजभे यांनी पंचायत राज संस्थेच्या बळकटीकरण करण्यासंदर्भात सदर अभियानात गावागावात सामाजिक सलोखा, शेतकऱ्यांचा विकास, गरिबांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना आणि ग्राम किसान सभा आयोजित करण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. संचालन तावाडे यांनी तर आभार लक्ष्मी कुमरे यांनी मानले. यावेळी पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)