गोवरी : कोरोना जागतिक महामारीच्या संकटात प्रत्येक माणूस हतबल झालेला आहे. कोरोनामुळे जगासमोर मोठे आव्हान निर्माण केलेले आहे. शहरापासून तर खेड्यापर्यंत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे सामान्य जीवन भयभीत झालेले आहे. अशा संकटात "त्यांनी" संबुद्ध पंचशील विहाराच्या परिसरात स्वच्छता करून व वृक्षांचे जतन करून त्यांची जोपासना करण्याचा विडा उचलल्याने गावात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
हा उपक्रम नागरिकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथे संबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनेश घागरगुंडे यांच्या कल्पकतेतून वॉर्डातील नागरिकांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने जनजागृती करून संबुद्ध पंचशील विहाराच्या परिसरात स्वच्छता करून याठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात आली. एकीकडे कोरोना काळात ऑक्सिजनसाठी नागरिकांचा जीव कासावीस होत असताना झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमअंतर्गत त्यांनी वृक्षसंवर्धन केले आहे. यासाठी संबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनेश घागरगुंडे यांनी आपल्याच वाॅर्डातील सर्व मुलांना तसेच सर्व नागरिकांना एकत्र आणत तक्षशिला बुद्ध विहाराचा परिसर नेहमीच स्वच्छ असावा याकरिता एक तक्षशिला बुद्धविहार स्वच्छता समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक दिवशी सामाजिक उपक्रमाबाबत प्रत्येकावर कामाची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये मंडळाचे संबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनेश घागरगुंडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ कासवते, पराग घागरगुंडे, कार्तिक गोरघाटे, सौरभ करमणकर. अमोल डंभारे, अनमोल घागरगुंडे. सुरेश कास्वटे , प्रमोद पडवेकर, सुमेश कोल्हे, गणेश गोरघाटे , नयन चुनारकर, मयूर कास्वटे, आशिष आडकापुरे, संदीप कास्वटे, चेतक गोरघाटे, सुजल आत्राम, बुद्धर्ष कास्वटे , लोभेष करमणकर , संतोष पडवेकर, समर्थ कास्वटे, संकेत घागरगुंडे, राकेश वाघमारे, निशा वाघमारे, सौरभ वाघमारे या सर्वांच्या व इतर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संबुद्ध पंचशील तक्षशिला विहाराच्या परिसरात स्वच्छता अभियान व वृक्षांचे जतन करून झाडे लावा, झाडे जगवा या उपक्रमाला हाती घेऊन सामाजिक बांधीलकी जोपासत सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
कोट
सध्या कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नसल्याने आजारी रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे भविष्यातील वातावरण स्वच्छ राहावे आणि या वृक्षाचा लाभ नागरिकांना घेता यावा, यासाठी सर्वांच्या सहकार्याने वृक्षांची जोपासना करणे सुरू आहे.
-प्रा. दिनेश घागरगुंडे अध्यक्ष, संबुद्ध पंचशील मंडळ, गोवरी.