शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

करारनामा देण्यास महानगरपालिकेची टाळाटाळ

By admin | Updated: July 19, 2015 01:18 IST

आतापर्यंत वादात अडकलेले घराघरातून कचरा संकलित करण्याचे कंत्राट अखेर महानगरपालिकेने तीन दिवसांपूर्वी सुरू केले.

चंद्रपूर : आतापर्यंत वादात अडकलेले घराघरातून कचरा संकलित करण्याचे कंत्राट अखेर महानगरपालिकेने तीन दिवसांपूर्वी सुरू केले. मात्र या कंत्राटाबाबत केलेला करारनामा दाखविण्यास वा देण्यात महानगरपालिका टाळाटाळ करीत आहे. वास्तविक करारनामा न करताच या कंत्राटी कामाचे उदघाटन केल्याचा आरोप महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक नंदू नागरकर यांनी केला आहे.घराघरातून कचरा संकलन करण्याच्या कंत्राटात चांगलाच घोळ झाला असल्याचा आरोप प्रारंभापासून आपण करीत असल्याचे नागरकर यांनी सांगितले. असे असतानाही याबाबत गांभीर्याने चौकशी करण्यात आली नाही. वास्तविक हा विषय स्थायी समितीत चर्चिला जाऊन तांत्रिक बाजु तपासणे, इतर महानगरपालिकेची माहिती मागविणे आवश्यक होते. मात्र स्थायी समितीच्या तत्कालीन सभापतींनी जबाबदारी झटकत हा विषय आमसभेत ढकलून बहुमताने पारित केला. या कंत्राटात दर अधिक लावण्यात आल्याचे पटवून दिल्यानंतर आयुक्तांनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशनला पत्र देऊन दर कमी करण्याचे सूचविले. मात्र या कंपनीने त्यास नकार दिला. आयुक्तांनी याबाबत आणखी एक पत्र कंत्राटदारांना दिले. दरम्यान, आ. नाना श्यामकुळे यांनी यात हस्तक्षेप करीत मनपातील मुद्यावर विश्रामगृहात बैठक घेतली. आयुक्तांवर जबाव टाकून तीन लाख कमी करून हे कंत्राट निश्चित केले, असा आरोपही नागरकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदारांसोबत कोणताही करार न करताच या कंत्राटाचे उदघाटन करून कामही सुरू करण्यात आले आहे. आपण २३ जून, १४ जुलै आणि १५ जुलैला वारंवार सदर करारनामा देण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली.मात्र मनपा प्रशासन करारनामा दाखविण्यास टाळाटाळ करीत आहे,असेही नागरकर यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)