शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

युवतीचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न

By admin | Updated: December 10, 2015 01:15 IST

एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची ...

बल्लारपुरातील घटना : एकतर्फी प्रेमातून केले कृत्यचंद्रपूर: एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी बल्लारपूर शहरात या सिनेस्टाईल घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. पीडित युवती पेपर सोडविण्यासाठी महाविद्यालयात गेली होती. त्यावेळी एका युवकाने चारचाकी वाहनातून आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने युवतीचे अपहरण केले व तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेला बेदम मारहाणदेखील करण्यात आली. या घटनेने विद्यार्थींनीमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपुरातील राजेंद्रप्रसाद वॉर्डातील रहिवासी श्याम भगत याची त्याच परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीवर वाईट नजर होती. ती बल्लारपुरातील गुरूनानक महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. श्याम भगत हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या मागावर होता. अनेकदा त्याने तिच्यापुढे प्रेमसंबंधाचा प्रस्तावदेखील ठेवला. मात्र सदर युवतीने त्याला धुडकावून लावले. बुधवारी दुपारी सदर महाविद्यालयीन युवतीचा परीक्षेचा पेपर होता. तो देण्यासाठी दुपारी १ वाजताच्या सुमारास ती महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात गेली. दरम्यान, काही वेळानंतर श्याम भगत त्याच्या काही मित्रांसमवेत स्कार्पिओ वाहनाने महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात पोहोचला. तुझी आई बाहेर उभी आहे. तिला तुझ्याशी बोलायचे आहे, अशी थाप त्याने पीडित युवतीला मारली. आईचे नाव घेतल्याने युवतीदेखील तातडीने महाविद्यालयाबाहेर आली. मात्र तिला तिची आई कुठेच दिसली नाही. आपली फसगत केल्याचे तिच्या लक्षात येताच, ती परत महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असता, श्याम व त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने वाहनात बसविले व वाहन बाजूच्या एका निर्जन गल्लीत नेऊन तेथे तिला मारहाण सुरू केली. श्याम एवढ्यावरच थांबला नाही तर, माझे प्रेम स्वीकार, नाही तर तुझा खून करतो, अशी धमकी देत तिच्याच दुपट्ट्याने तिचा गळा आवळला. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून आजुबाजूचे लोक तिच्या मदतीसाठी धावले. त्यांनी तिच्या श्याम व त्याच्या मित्रांच्या तावडीतून सोडविले. लगेच युवतीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी श्याम भगत व त्याच्या साथिदाराविरुद्ध भादंवि ३०७, ३५४, ३५५ (३४) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. (प्रतिनिधी)