शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीच्या विद्युत कार्यालयावर हल्लाबोल

By admin | Updated: June 30, 2017 00:50 IST

येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता युवराज मेश्राम यांच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहकांना शारीरिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

वीज बिलांची केली होळी : विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोर्चालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता युवराज मेश्राम यांच्या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहकांना शारीरिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांनी गुरुवारी दुपारी झाशी राणी चौकातील कार्यकारी अभियंता कार्यालयावर आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करून वीज बिलाची होळी केली. सदर मोर्चा गुरूवारी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातून काढण्यात आला. मोर्चात शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहक सहभागी होऊन वीज वितरण कंपनीच्या विरोधात नारेबाजी करीत कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर धडकले. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहा. कार्यकारी अभियंता, तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, माजी नगरसेवक विलास विखार, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे आदींच्या उपस्थितीत संयुक्त चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये मागील वीज बिलाच्या आधारे सरासरी रिडिंग विचारात घेऊन वीज बिल तयार करण्यात यावे, मुदतीच्या आत वीज बिल वितरित करावे, यापूर्वी ज्या ग्राहकांना बिल देण्यात आले त्यांनी मुदत गेल्यानंतर बिल भरल्यास त्यांना दंडाची रक्कम माफ करावी, वीज बिल वाटप व मीटर रिडिंगसाठी नेमलेल्या एजन्सीचे काम रद्द करून स्थानिक एजन्सीला काम देण्यात यावे, वीज ग्राहकांना वेळेवर मिटर देण्यात यावे आदी विषयावर चर्चा करून लेखी आश्वासन अधीक्षक अशोक म्हसे यांनी दिले. परंतु, चर्चेदरम्यान नव्याने नेमून दिलेल्या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी रेटून धरल्याने आ. वडेट्टीवार संतप्त होऊन अधिकाऱ्यांना कंत्राट रद्द करण्यास भाग पाडले. मोर्च्यात प्रतिभा फुलझेले, रश्मी पेशने, स्मिता पारधी, निलीमा सावरकर, मंगला लोनबले, नितीन उराडे, काशिनाथ खरकाटे, विनोद बुल्ले, वामन मिसार, शामराव इरपाते व शहरातील तसेच तालुक्यातील हजारो वीज ग्राहक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.