शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक परकोटावरील अतिक्रमण पोहोचले पोलीस ठाण्यात

By admin | Updated: February 21, 2016 00:30 IST

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक परकोटाची झालेली पडझड व काही ठिकाणी याच परकोटावर झालेल्या ...

रितसर तक्रार : पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक, आमदार व मनपा आयुक्तांवर आरोपचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक परकोटाची झालेली पडझड व काही ठिकाणी याच परकोटावर झालेल्या अतिक्रमणाच्याविरोधात शनिवारी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांची भेट घेऊन त्यांनाही तक्रारीची एक प्रत देण्यात आली. परकोटाची झालेली पडझड व त्यावरील अतिक्रमणाला पुरातत्व विभागाचे अधीक्षक, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त, तत्कालीन स्थानिक आमदार जबाबदार असल्याचा आरोप बेले यांनी तक्रारीतून केला आहे. आता या तक्रारीवर पोलीस काय कारवाई करतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला चहुबाजूंनी परकोट आहे. तसेच परकोचे जटपुरा गेट, पठाणपुरा, अंचलेश्वर गेट, बिनबा गेट असे चार दरवाजे आहेत. तसेच आठ मुख्य खिडक्या आहेत. सन १४६१ नंतर गोंडराजांनी हा किल्ला बांधला. परकोटाची उंची १५ ते २० फुटांची असून ते साडेसात मैल लांबीचे आहे. सदर ऐतिहासिक किल्ला हा जवळपास ४५० ते ५०० वर्षे जुना आहे. एनसियंट मॉनुमेंटस् अ‍ॅन्ड आरकियोलॉजिकल साईटस् अ‍ॅन्ड रिमेन्स अ‍ॅक्ट १९५८ या अधिनियमानुसार या किल्ल्याचे संरक्षण होणे गरजेच आहे. परंतु पुरातत्व विभागाकडून कोणत्याही कर्तव्याचे पालन होत नसल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. या ऐतिहासिक किल्ल्याची पडझड होण्यास पुरात्वव विभागाचेच अधिकारी जबाबदार असून या अधिकाऱ्यांशी संगनमत करूनच परकोटाची तोडफोड करून तेथे घर, दुकाने, चिकन सेंटर, पानठेला आणि रस्ते बांधले जात असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने पुरातत्त्व विभागाची कोणतीही पूर्व परवनागी न घेता नियमांची पायमल्ली करून बिनबा गेट व अंचलेश्वर गेट येथे किल्लाला लागून शौचालय बांधले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामाला इजा पोहोचली असल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आला आहे. यासोबतच जटपुरा गेट ते रामाळा तलाव रस्त्याने किल्ल्याला लागून आमदार निधीतून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय बांधण्यात आले आहे. ते देखील नियमबाह्य असल्याचा आरोप बेले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)