शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

By admin | Updated: June 28, 2014 02:29 IST

बळीराजाला लागलेले ग्रहण निसर्गानेच गुरुवारी सोडविले. गुरुवारी जिल्ह्यातील काही तालुक्याने पावसाचे आगमन झाले आणि ...

चंद्रपूर : बळीराजाला लागलेले ग्रहण निसर्गानेच गुरुवारी सोडविले. गुरुवारी जिल्ह्यातील काही तालुक्याने पावसाचे आगमन झाले आणि पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेला बळीराजा धरणीमातेची तृष्णा शांत होताच तृप्त झाला. आतापर्यंत खोळंवलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा वेग आला असून शेतातील लगबग जोमात सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या दोन्ही हंगामात झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशेपोटी शेतकरी मोठ्या उत्साहाने जूनच्या प्रारंभीच खरीपासाठी तयार झाला होता. मशागतीची कामे आटोपली. सर्वात कठीण असलेली पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. मृग लोटून पंधरवाडा उलटला. तरीही पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे आणखी काही दिवस पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांची झोपच उडाली होती. यंदा जिल्ह्यातील चार लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. यात एक लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यासोबतच एक लाख ७९ हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात येणार असल्याचाही कृषी विभागाचा अंदाज आहे. एवढे मोठे खरिपाची लागवड होणे पावसाअभावी शिल्लक होते. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत होता. जूनचा अखेरचा आठवडाही सुरू झाला. तरीही पावसाची चिन्ह नव्हती. उलट उन्हाची काहिली जाणवत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना २०१२ चा दुष्काळ आठवू लागला होता. अशातच काल बुधवारी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर तब्बल तासभर पाऊस पडत राहिला. या पावसामुळे जमिनीत पाणी साचले नसले तरी जमीन बऱ्यापैकी ओली झाली आहे. त्यामुळे पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी जमीन ओली होताच शेतीकडे धाव घेणे सुरू केले आहे. बी-बियाणे घेऊन आतापर्यंत हातावर हात ठेवून असलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. (शहर प्रतिनिधी)