शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी क्षेत्रात तीन कोटींच्या विकास कामांना मंजुरी

By admin | Updated: September 7, 2015 01:21 IST

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती.

ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अपघाताला सुद्धा समोरे जावे लागत होते. याची दखल घेत आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता आणि कर्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांना लेखी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून रस्ता दुरुस्तीसाठी निधी देऊन कामे मंजूर करावे, अशी मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रात २ कोटी ५७ लक्ष ७० हजार विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली या तालुक्याचा समावेश असून निवडणुकीपूर्वी या तीनही तालुक्यांमध्ये दौरे करीत असताना अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनात आले. त्यांनी नागरिकांना रस्ते बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. वचनपूर्तीसाठी आमदार वडेट्टीवार यांनी रस्ते दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सावली तालुक्यातील बोथली, सावली, सिर्सी, व्याहाड रस्ता बांधकामासाठी ४२ लाख ७८ हजार रुपयांचा निधी, व्याहाड, निफंद्रा, अंतरगाव, मुडझा रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ४२ लाख ७३ हजार रुपये, व्याहाड (बु.) ते गाव तलावपर्यंतच्या रस्त्यासाठी २८ लाख ४२ हजार रुपये, ब्रह्मपुरी तालुक्यातील नेरी, बोथली, तळोधी, मेंडकी, गांगलवाडी रस्ता कामासाठी ३८ लाख ३७ हजार रुपये, सिंदेवाही तालुक्यातील मंगरमेंढा, पालेबारसा, जनकापूर, सामदा रस्त्याच्या कामासाठी २९ लाख ५९ हजार रुपये, वासेरा, गडबोरी, सिंदेवाही रस्ता कामासाठी ४१ लाख ६० हजार रुपये, असा एकूण २ कोटी ५७ लाख ७० हजार रुपयांच्या कामांना ५०५४ मार्ग व पूल त्यावरील भांडवली जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत १ सप्टेंबर रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. या कामांना लवकरच सुरूवात होणार असून अनेक रस्त्यांची दुरूस्ती होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आभार मानले आहे. (तालुका प्रतिनिधी)