शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातील कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू

By admin | Updated: July 11, 2015 01:41 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै २०१५ रोजी हा निर्णय घेतला आहे.

घनश्याम नवघडे नागभीडराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै २०१५ रोजी हा निर्णय घेतला आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यान्वित आहे. या अभियानामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आणि राष्ट्रीय रोगनियंत्रक प्रतिबंधक कार्यक्रम या योजनांचा समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानास केंद्र शासनाने सन २०१२-२०१७ या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य आरोग्य सोसायटीची स्थापना करण्यात आली असून सदर सोसायटीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मुक्त व्यवस्थेमार्फत जाहिरात देऊन शैक्षणिक अर्हता, अनुभव व वय आदी पात्रता तपासून विविध स्वरूपाच्या कंत्राटी नियुक्त्या मर्यादित कालावधीसाठी केल्या जातात. सदर कंत्राटी तत्वावरील पदांचा सामाजिक आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र अनु. जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग आरक्षण अधिनियम २००१ हा ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता देण्यात येणाऱ्या व आलेल्या सर्व कंत्राटी नियुक्त्यांना लागू असल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व कंत्राटी तत्वावरील नियुक्तीसाठी सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले आहे.