शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईसाठी १६ फेब्रुवारीपासून करता येणार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

नामांकित शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता पालकांची इच्छा असते. मात्र, भरमसाट शुल्क असल्यामुळे इच्छा असूनही प्रवेश घेता येत नाही. परंतु आरटीई कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील पालकांचे, आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने जानेवारी महिन्यामध्ये वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांसाठी पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक मागील महिन्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज करता येणार होते. मात्र, कोरोना संकटामुळे सध्या शाळांना सुटी देण्यात आल्याने शिक्षण विभागानुसार आता तारीख पुढे ढकलली असून, १६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.नामांकित शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता पालकांची इच्छा असते. मात्र, भरमसाट शुल्क असल्यामुळे इच्छा असूनही प्रवेश घेता येत नाही. परंतु आरटीई कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील पालकांचे, आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने जानेवारी महिन्यामध्ये वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार होते. मात्र, मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शाळा पडताळणी झाली नव्हती. त्याकरिता ऑनलाईन अर्जाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, आता १६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज करता येणार  आहे. त्यानंतर पुढील पडताळणी होणार आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आवश्यक- आरटीई कायद्यानुसार गोरगरीब घटकातील विद्यार्थांना शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी शिक्षण विभागाने निकष बदलले आहेत. - पूर्वी कोणत्याही बँकेचे पासबुक रहिवासी म्हणून विचारात घेतले जायचे. पण आता राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबुकच महत्त्वपूर्ण पुरावा मानला जाणार आहे. यासाठी आता पालकांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागणार आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र